चंद्रकांत कदम बुवा म्हणजे कोकणातील कोहिनूर हिरा! किती सुंदर भजन गायले आहेत ! लाजवाब! तसेच परशुराम पांचाळ बुवा, विलासबुवा पाटील, खोपकरबुवा, स्नेहल भाटकर आणि असे अनेक कोहिनूर हिरे आम्हच्या कोकणात जन्माला आले, याचा मला सार्थ अभिमान वाटतो! ❤ विलासबुवा पाटील यांचे ही असेच सुंदर भजने " सर्वांगी सुंदर " या नावाने RU-vid वर प्रसिद्ध आहे! त्यामध्ये " रुसलेल्या रखूमाईला विठ्ठल समजावू लागला " हे भजन खूप सुंदर आहे! ❤❤❤ पासून कोकणातील या सर्व बुवांना माझा मुजरा!
अतिशय उत्तम ठेवा तुम्ही आमच्यासाठी उपलब्ध करून दिला लाख लाख धन्यवाद 🙏 लहानपणी आमच्या चाळीत ह्या दोन बुवांच्या डबलबारी भजन असायची खुप मजा यायची. हेच भजन विसुभाऊ बापट यांनी कुटुंब रंगलंय काव्यात यात सुध्दा समाविष्ट केले आहे
1973 सालामध्ये हेच भजन मी करूळ काच कारखाना येथे ऐकलं होतं .कदम बुवा...सोबत पांचाळ बुवा होते, जुन्या आठवणी जागृत झाल्या . फोंडा घाट येथूनआम्ही चालत करून येथे आलो होतो..