सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेले आणि रामायण काळातील दंडकारण्याचा इतिहास सांगणारे निसर्गाचे सर्वांग सुंदर वरदान लाभलेले आणि भारतीय मंदिर शैलीचा अति उत्कृष्ट वारसा सांभाळणारे एक सुंदर व सुसंपन्न गाव म्हणजेच टाहाकारी . अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर पश्चिम टोकाला , अकोले तालुक्यातील नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीला लागून वसलेले टाहाकारी हे गाव अति प्राचीन अशा हेमाडपंती शैलीतील जगदंबा मातेच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे . येथील नवरात्र उत्सव आणि चैत्र उत्सव महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून महाराष्ट्रभरातून भाविक या उत्सवांना हजेरी लावतात . त्रिदल शैलीतील येथील मंदिर अजूनही अत्यंत सुस्थितीत आहे सुमारे 72 खांबांवर तोललेले पाच कळस मंदिराची भव्यता व दिव्यता अबाधित राखून आहेत . मुख्य गर्भगृहातील सुमारे दहा फूट लांब व सहा फूट रुंद अशा अखंड काष्टातली देवीची महिषासुरमर्दिनी अवतारातील काष्टमूर्ती विशेष विलोभनीय आहे .. या मंदिराच्या आणि गावच्या निसर्गा विषयी सर्व काही पाहण्यासाठी यूट्यूब चैनल ला नक्की सबस्क्राईब करा....!! जय अंबे 🚩