उच्चारिता राम होय पापक्षय । पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ॥३॥ काही केल्या तुझे मन पालटेना । दास म्हणे जन सावधान ॥५॥ ऐकत रहावे असे वाटते. खूप छान. वरील दोन कडव्यांचा अर्थ कोणी तरी कृपया स्पष्ट करावा.
बऱ्याच अंतराने हा व्हिडिओ नेहमीच्या आंतरिक तळमळीने प्रसिद्ध झाला आणि छान वाटले नव्या काळातील तंत्रज्ञानाचे सामाजिक स्वास्थ्यावर होणारा असा परिणाम हा सार्वजनिक चिंतेचा विषय व्हायला हवा इतका गंभीर आहे. त्यासाठीच्या प्रगल्भ, विवेकी साक्षरतेचा अभाव सर्वत्र आहे त्यामुळे जो तो आपापल्या सोयीने चुकीचे समर्थन करू लागतो. पुढील काळात हळूहळू का होईना समाज सोशल मीडिया व्यसन मुक्त व्हावा हीच सदिच्छा!
या मालिकेतील सर्वच आठवणी हृद्य आणि उत्कट. "निखारा" कवितेचा उल्लेख हेलावून सोडणारा. आयुष्यातील विवेक, सुसंस्कार यासारख्या मूल्यांची पायाभरणी अशाच प्रसंगातून अधिक घट्ट होत जात असते. तुम्ही सर्व भावंडे खरेच अत्यंत नशीबवान!