आपल्या मुंबईकर प्रथमेश चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत, इथे आपल्याला मुबंई मधील, प्रदर्शन, मालवणी व कोकणी जत्रा, देवस्थान, पर्यटन स्थळ, सण उत्सव बैलगाडा शर्यत पाहायला मिळतील, आपल्या युट्युब चॅनवर नवीन असालतर सबस्काराईब करायला विसरु नका धन्यवाद ☺🙏
आता राजस्थानीं लोकं पण मुर्त्या विकत आहेत ते ही नाममात्र किमतीत , आपल्या लोकांनी मूर्त्यांचे इतके भाव लावले आहेत की त्यांच्या स्टॉलला कोण फिरकत पण नव्हते
जर हा मुर्तींचा बाजार असेल, तर लोक कमी किमतीत सौदेबाजी करतील, यात काय चूक आहे... हा व्हिडिओ खरेदीदाराच्या मनाला शंका न घेता पैसे देण्यास कंडिशन करण्यासाठी आहे. प्रत्येक ठिकाणी खोट्या भावना दाखवल्या जातात. सर्व लोक त्यांच्या व्यवसायासाठी काय करतील हे माहित नाही.
अहो तुम्ही मनाला वाटेल तशा किंमती सांगणार आणि पुन्हा गणेश भक्तानां सांगणार की देवाचा भाव करायचा नाही..... हे फार चुकीचे आहे.. अहो किती महाग किमती लावतात... सर्व सामान्य गणेश भक्त कसं काय घेणार एवढ्या महाग मुर्ती... मग तो भाव करणारच की.. तुम्ही परवडेल अशी किंमत ठेवली तर कोण करेल हो भाव. हे संपूर्ण महाराष्ट्रात असच होत आहे.. आवाज उठवला पाहिजे
देवाचा भाव करायचा नाही अस आपण ठरवलं तरी देवाचा अव्वा चे सव्वा भाव लावणार नाही अस काही व्यापारी ठरवत नाही. मूर्तिकार कडून अगदी नाम मात्र किमतीला मूर्ती आणून रंगरंगोटी करून दहा पट किमतीला विकून पैसे कमवणाऱ्यानी ग्राहकांना देवाची किंमत करू नका असा सल्ला देणे योग्य नाही. जास्तीत जास्त नफा कमावणे हा व्यापाऱ्यांचा धर्म आहे आणि कमीत कमी किमती मध्ये खरिदी करणे हा ग्राहकांचा धर्म आहे. जर तुम्ही सरळ मूर्तिकार कडून मूर्ती घेत असाल तर विषय वेगळा परंतु जर साध्या विक्रेत्या कडून तुम्ही हे घेत असाल तर मात्र तुम्ही तुमच्या ग्राहक धर्माला जागल पाहिजे.
या गुजराती मारवाड्यानी भाव वाढवून ठेवले आहेत. मनात येईल तेव्हा गणपती बसवतात,वाटेल तेव्हा विसर्जन करतात.समोरचा बोलेन त्या किमतीला मूर्ती विकत घेतात, त्यामुळे सर्व सामान्य लोकांना मूर्ती विकत घेणे कठीण झाले आहे.
देवाचा भाव करतो म्हणून भावनिक व्हिडिओ बनवायचे पण त्याच देवाला तू स्वतः विकतोय त्याचं काय?... त्यामुळे जोपर्यंत गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना होत नाही तोपर्यंत हा व्यापार आहे आणि त्यानंतर देवी भावना आहेत.