आपल्या सुमधुर वाणीतून आपण आम्हाला ज्ञानियांचा राजा सुंदर रित्या मनचक्षू समोर उभा केला. खूप खूप धन्यवाद सर . श्रीमान संजय माटे सर आपण हा खजिना सांभाळून ठेवला, आपले मनापासून आभार 🌹🌹🙏
अत्यंत मधूर, ओघवती भाषा आणि अभ्यास पूर्ण व्याख्यान, खुमासदार पणे व्यक्त होणे यामुळे सरांबद्दल खूप आदर, आपुलकी वाटते आणि प्रत्यक्ष पाहणे व ऐकण्याची संधी मिळाली हे आमचे महद् भाग्य.
खूपच मार्मिक संदेश व टिपण्णी. सर तुम्ही खूप च हुशार. मी काॅलेज करत होते. तेव्हा तुम्ही फलटणचे मुधोजी काॅलेजला प्राचार्य होता. खूपच मायाळू व प्रेमळ बोलणे. स्वामी विवेकानंद महणजे आपल्या देशाचे धर्म दूत होते. आता अशी व्यकती होणे नाही. खूप खूप धन्यवाद सर.