I'm also a Hyderabadi. Very much impressed by this modified Eeco. Can you please give me Mr.Ravi's phone number so that I can meet him. Thanks in advance.
"कासव" हा एक संवाद आहे. निसर्गाशी, माणसांशी, आणि स्वतःशी. साधा सरळ आणि सोपा. सकारात्मकतेकडे घेऊन जाणार हा एक "कासव" प्रवास आहे. स्वतःला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या मध्ये नक्की मिळतील. चित्रपट कासवाच्या गतीने सुरू होतो. तो जसजसा पुढे जातो तसे तुम्ही त्याच्याशी एकरूप होता, त्याची तुमच्या मनावरील पकड घट्ट होते. कदाचित हा चित्रपट स्वतःशी संवाद घालण्यास प्रेरित करेल. सहज आणि सोप्या भाषेत याची मांडणी आहे. चित्रपटाची सुरवात, मध्यांनतर आणि शेवट अगदी अर्थपूर्ण आहे. बऱ्याच गंभीर गोष्टींचा अगदी मजेशीरपणे उलगडा केला आहे. शरीरानं सदृढ असण्यासोबत मनानं ही सदृढ असावं लागत, जर का मानसिकदृष्ट्या सदृढ व्हायचं असेल तर नक्की "कासव" पहा. दिग्दर्शक - सुमित्रा भावे