Evening walk साठी ऐकायला घेतलेले कधी संपलं कळलं च नाही. अप्रतिम. दुःख याच गोष्टीचं की आपल्या कडचे चॅनल हे अजूनही दाखवायला तयार नाही. अतीशय सुंदर आणि वास्तव दाखवणारा हा व्हिडिओ 👍
अत्यंत सुंदर ,विस्तृत आणि अभ्यासपूर्ण विवेचन आपण केलत संदीप दादा.... आपल्या कार्यात आम्ही सुद्धा सहभागी आहोत... या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन पिढीला वारी काय असते हे समजून सांगितल्याबद्दल आपले आणि चॅनलचे खूप खूप आभार... आता आम्ही वारी नक्की करणार...🙏🏻 आपला व्हिडिओ बघून सुचलेल्या ओळी... वारकरी संप्रदाय स्वच्छ, सुंदर,निर्मळ जगायला शिकवते......🚩 नियोजनबध्द प्रपंच आणि मनमुराद भक्ती करायला शिकविते....🚩 "अहं" च्या चिखलातून आपसूक बाहेर काढून अध्यात्म,संयम, सुख समाधानाच्या ओंजळीत देते...🚩 शरीराचं नाही तर आत्म्याचं पावित्र्य अबाधित ठेवते...🚩 विचाराने च नाही तर आचरणाने मोठं करते ....🚩🚩🚩🚩 इतका सुंदर सोपा वारकरी संप्रदाय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय हरी विठ्ठल 🚩🚩