गणेशोत्सवाच्या काळात कोकणात संगीत भजनांचा अक्षरश: जल्लोष उडतो. शहराप्रमाणे वेळेचे बंधन नसल्याने गावागावांतील वाड्यांवर कुणाच्या खळ्यात तर कुणाच्या घरात पहाटेपर्यंत भजने रंगतात. एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी हातात वाहने नसली तरी भजनाच्या प्रेमापोटी पायपेटी, मुदृंग, तबले डोक्यावर घेऊन जाणारे हौशी कलाकार कमी नाहीत. भजनांची बिदागी पाचशे-हजार रुपयांच्या पलीकडे जात नाही तरीही भजनी मेळ्यांचा उत्साह मात्र अफाट असतो. कुणाच्या घरी चिवडा लाडू तर कुठे उसळ-मिसळ पावचा आस्वाद घेत ही कला कोकणातील कलावंतांनी जिवंत ठेवली आहे. तसेच त्यांनी वेगवेगळ्या चालीरित्या मध्ये गायलेल्या गवळण ,अभंग, गण, गजर या चॅनेल वर तुम्हाला पाहण्यास भेटील .