श्री स्वामी समर्थ!! नमस्कार मंडळी 🙏 मी सौ.पल्लवी संदेश पाष्टे (Pallavi Sandesh Pashte) मी youtube वर "पाककृती with Pallavi" नावाचं आपल्या मराठी भाषेतील चॅनल सुरू केल आहे. या चॅनलवर तुम्हाला स्वयंपाकासंबंधी व्हिडिओ पाहायला मिळतील.मला आशा आहे की जे जेवणात नवशिके आहेत किंवा शिक्षण, नोकरी निमित आपल्या परिवार पासून लांब आहेत त्यांना माझ्या पाककलेचा थोडासा तरी उपयोग होईल. इथे मी आपल्या काही जुन्या काही नवीन रेसिपी छोट्या छोट्या टीप सहित दाखवणार आहे. जस की काही नाश्ता, गोडाचे, सणवारासाठी केले जाणारे खास पदार्थ, हॉटेलमध्ये मिळणारे पदार्थ, पेय, नॉनव्हेज, कोकणातले, फळभाज्या पालेभाज्या, चटणी, काही तोंडी लावणारे इत्यादी बरेचशे पदार्थ दाखवणार आहे.मला जमतील तशा नवनवीन रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेन. पाककलेविषयी जे ज्ञान मला आहे ते तुमच्या पर्यंत पोहचवायचे आहे. तरी आपण सर्वांनी मला सहकार्य करावे हि विनंती आहे. माझी पाककृती (व्हिडिओ) थोडेफार आवडत असतील तर माझ्या चॅनेलला like, Share,Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या पाककृतीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद 🙏🙏