अप्रतिम चित्रपट आहे, शेतकऱ्यांना होणारा त्रास. आणि काही भांडगूळे यांच्या चाटेगिरीमुळे प्रामाणिक माणसाचे हाल, खडतर परिश्रम परिस्थितीशी सामना करत जीवन जगत असताना कितीतरी संकटाना सामोरे जावं लागत. स्वप्नांना फक्त अंधारातच सजवत मनाला समाधानी करुन घ्यावे लागते. अक्षरशः खरच खुप रडलो जेव्हा बापाचा मृत्यू होतो आणि ते गीत पाहून डोळ्यातले अश्रू थाबंत नव्हते. मी बबन पाहिला आणि भाऊसाहेब तुमचा खुप मोठा फँन झालो. खरच मला तुमचा अभिनय त्या गावकडच्या मातीत घेवून जातो. ख्याडा सुध्दा अप्रतिम चित्रपट आहे. खरतर डायरेक्ट आणि सर्व टिमने घेतलेली मेहनत हे आम्हाला तुमच्या कलेकडे खेचून आणते. खुपखुप धन्यवाद तुम्हां सर्वाना व अभिनंदन व पुढील अनेक यशस्वी चित्रपटासाठी शुभेच्छा .