साहित्यMoDe म्हणजे मराठी/हिंदी साहित्यातली मुशाफिरी. कथा, कविता, शायरी,लेख, अलक(अति लघुकथा), नाटयांश,परीक्षणं यांचं प्रभावी अभिवाचन या शब्द मैफिलीत आपणही सामील होऊ शकता. स्वलिखित वाचून ऑडिओ/विडीओ स्वरुपात sahityamode2020@gmail.com वर पाठवा. निवडक वाचकांना इथे प्रसिद्धी देऊ आणि आपणही आमच्यासमवेत या साहित्य दिंडीत सामील व्हाल. चला तर मग पाहूया,लिहूया,वाचूया,संवाद साधूया, समृद्ध होऊया साहित्यMoDe संगे. आइए, देखें,लिखें,पढ़ें,जुड़ें,संपन्न बनें साहित्यMoDe के ज़रिए. #sahityamode
१०० वा लाईक माझ्या कडून येणं हा माझ्यासाठी मोठा सुयोग आणि आनंदाचा क्षण आहे असेच मी मानतो. हे असं मानण्याचं कारण असं की दुर्गाबाईंच्या दैवी लेखणीतून साकारलेले ऋतुचक्र हे त्यांचे अजरामर आणि कालातीत पुस्तक माझ्याकडे गेली २० वर्षे आहे. पण तुम्ही ज्या प्रकारे त्यातल्या प्रत्येक ओळी मधल्या वर्णनाचा अर्थ निसर्गाच्या विविध चित्रातून उलगडून दाखवला, त्यामुळेच आज खऱ्या अर्थाने ऋतुचक्र समजायला सुरुवात झाली. इतरही ऋतुंबद्दल असेच व्हिडिओ असतील अशी आशा करतो..तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि असे उपक्रम कायम करत रहा आणि पुढच्या पिढीलाही तुमचे हे व्हिडिओ एक प्रेरणास्रोत ठरो अश्या शुभेच्छा देतो.
ग्रेट कवी ... ग्रेट कविता ... आणि तितकेच ग्रेट अभिवाचन. कवितेला समर्पित होऊन तिच्यातल्या सुक्ष्मातिसूक्ष्म स्पंदनांचं वाचन ह्या सादरीकरणात पेश झालं आहे. माझी आग्रहाची विनंती आहे. की आपण अविनाश सरांच्या ह्या संग्रहातील अन्यही कविता जरूर वाचाव्यात. पहिल्या दोन कविता तर अवश्य अवश्य आपल्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहचावी. ही फर्माइशवजा विनंती. विशुध्द कविता काय असते. हे अविनाश सरांच्या कवितेतून आम्ही शिकतोय.