क्रिशिव बाळाला ६ महिने पूर्ण झाल्याबद्दल त्याच्या अभ्यंगस्नानाचा केलेला कार्यक्रम खूप सुंदर. बाळाच्या अभ्यंगस्नानासाठी घंगाळ चा केलेला वापर, आजूबाजूला केलेली फुलांची सुंदर सजावट,गाण्याचा दिलेला सुंदर साज आई,वडील,आजी,पणजी,नातेवाईक यांच्या हातून बाळाला मिळालेला अभ्यंगस्नानाचा आनंद त्याच्या इतकाच आम्हाला ही आनंद देणारा असाच आहे . बाळाने या अभ्यंग स्नानाला दिलेला प्रतिसाद,त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मन सुखावले. ❤️❤️❤️
श्रीकृष्ण रूपातील देखणा क्रिशिव बाळ आणि त्याच्या जन्मानंतर आपला मामा कंस याच्या कारागृहातून लगबगीने नंद राजाकडे छोट्याशा टोपलीत घेऊन जाणारे त्याचे वडील वासुदेव रूपातील गौरव पाहून खरोखर श्रीकृष्ण जन्माची कहाणी डोळ्यासमोर उभी राहते. दोघांची वेशभूषा , गोकुळातील जन्मोत्सवाचे आनंददायी वातावरण,आनंदाने त्याच्या पाळण्याची दोरी हाती घेतलेली यशोदा मय्या , आजी ,पणजी, गोकुळवासी आणि अगदी शांतपणे त्याकडे पाहणारा श्रीकृष्ण अर्थात क्रीशिव बाळ. सारं चित्रण सुंदर आणि श्रीकृष्ण जन्माला साजेसे. ❤️