ताई श्रीराम श्री गोंदवलेकर महाराज यांच्या नित्यनैमित्तिक उपासना पुस्तिकेतील शेवटच्या दोन पानावर दिलेली आणि श्री गोंदवलेकर महाराज यांनी स्वतः सांगितलेली एक वेगळी मानसपुजा आपल्याला गेय स्वरूपात उपलब्ध करून देता आल्यास पहावे. श्रीरामा पतितपावना । जानकीजीवना। तुझे रूप माझ्या ध्याना। राहो ऐसे करी ॥ असे टे शब्द आहेत.
अनेकांनी ही मानसपुजा ऑनलाइन असेल तर शोधण्यास सांगितले पण प्रयत्न करूनही मिळाली नाही. कोणाला सांगायचे यांचा शोध घेतला असता आपले नाव समोर आले आणि आपली you tube वरील काही श्लोक ऐकण्यात आले. वाटले की ही गुरुभगिनी नक्कीच मदत करेल. विश्वास वाटला आणि श्री महाराजांना विनंती करून आपल्याला संदेश दिला. 🙏🙏