पुणे जिल्ह्यातील, खेड तालुक्यातील, कान्हेवाडी बु. या गावात मागील 4 वर्षांपासून परसबाग विषयक काम चालू आहे. या कामाचे संयोजन व नेतृत्व हे गावातीलच महिला करत आहेत. महिलांच्या या गटाचे नाव "परसबाग मैत्रीण" असे आहे. कान्हेवाडी बु. गावात परसबाग विषयी जे काम सुरू आहे, ते काम राज्यातील इतरही ग्रामीण भागामध्ये पोहचावे यासाठी हा यूट्यूब चॅनेल आम्ही सुरू करत आहोत.