खूप छान! राग विस्तार करताना वातावरण निर्मिती सुरेख झाली. द्रुत लयीत गाताना, पंडित राम मराठे यांची नात आहे, तो वारसा जपला आहे हे सिद्ध केले. अशीच उत्तरोत्तर गात रहा! प्रगती करत रहा. आजोबा, वडील यांच्या कडून मिळालेली ही अभिजात परंपरा जपत, वाढवत रहा.
सुंदर सादरीकरण! पंडित राम मराठे यांनी मिश्र राग खूप प्रसिद्ध केले. त्यांचे गाणे खरोखरच दोन रागांचे मिश्रण असायचे. तसे राग गाऊन तू ( वयाने मोठी आहे म्हणून) सिध्द केले आहेस की तू तो वारसा छान जपत आहेस.
अत्युत्तम गायन! गाण्यात प्रगल्भता आहे, आणि ते ही या वयात! असे कलाकार RU-vid च्या मदतीने आणि कार्यक्रमांचे आयोजन करून, याचे व्हिडिओ RU-vid वर अपलोड करणार्या संस्था/व्यक्तीमुळे, पुढील पिढ्यानपिढ्यांपर्यंत शास्त्रीय संगीत जिवंत ठेवतील, ही खात्री वाटते. तोपर्यंत, भारतात भरपूर सुबत्ता झाल्यावर, शास्त्रीय संगीताचे भरपूर कार्यक्रम उत्तमोत्तम कार्यक्रम स्थळी सुद्धा होतील, जिथे मोठे प्रवेश शुल्क सहज देऊन ( संख्येने खूप वाढलेले) श्रोते येतील (प्रगत देशांप्रमाणे). एकूण, शास्त्रीय संगीताला आणि कलाकार (सहकलाकार धरून) यांना ऊर्जितावस्था येईल, ही खात्री वाटते. स्वरांगी ला शुभाशीर्वाद!