Hello, I am Mrs. Madhura Watve . Welcome to my channel "Madhura's Mejwani"
मैत्रिणींनो असा कोणताही पदार्थ नाही जो बाहेर, हॉटेलमध्ये मिळतो पण आपण घरी बनवू शकत नाही . पदार्थ घरी बनविण्याचे अनेक फायदे आहेत. पदार्थ घरी बनविल्यामुळे शुध्द आणि सात्विक तर होतोच पण घरातील लहान मुले, तरुण मंडळी , वयस्कर व्यक्ती यांना आवडेल- पचेल असे बनवू शकतो .जसे की, एकच भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवली आणि त्याला प्रत्येक वेळी वेगवेगळी नाविन्यपूर्ण नावे दिली , थोडे मसाले वेगवेगळे वापरले ,वेगळ्या पध्दतीने ती सर्व्ह केली की प्रत्येक वेळी ती नवीन भासेल आणि खाणारेही आवडीने खातील .तसेच पदार्थ बनवत असताना शरीराला आवश्यक घटकांचादेखील विचार करावा लागतो .अशाच काही रेसिपी मी घेऊन येत आहे.तरी माझ्याकडील माहितीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या घंटीवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी आपल्याला वेळोवेळी पाहता येईल. #MadhurasMejwani #Madhuramejwani #madhurachimejwani #madhurawatve #madhuravatve #vatve #watve #madhura #marathi #recipes
ॐनम: शिवाय आंबा बरफीॆॆऀ खुपच छान आणि सोप्य पद्धतीची दाखविली त्या बद्दल धन्यवाद मलाही तुम्हाला काही रेसीपी शेयर करायच्या आहेत पण युट्युब वर कसे यायचे ते सांगा आधी कमेंट बॉक्स मध्ये मी अनुपमा गाेपाळ शिवलकर राहणार शुभांगण बिल्डिंग माझगांव डॉक कंपनी समाेर माझगांव मुंबई ४००/१० डाॉकयराेड टेशन श्री सदगुरु नाथ महाराज की जय जय महाराष्ट्र शुभ रात्री
थंड करण्यासाठी फ्रिझर मध्ये ठेवली होती हे सांगायला हवे होते. आणि direct लहान ताटलीतच का नाही बर्फी थापली? लहान ताटलीत थापून फ्रीझर मध्ये ठेवल्या तरी चालले असते की. बर्फी चांगली दिसते आहे पण दोनदा थापण्याचे कारण समजले नाही . मी पण करते पण शेवटी मिल्क पावडर ऐवजी पिठीसाखर घालते . घट्ट गोळा झाल्यावर बर्फी थापायची खव्यामुळे बर्फी मऊ होतेच . फ्रीझर मध्ये ठेवण्याची गरज नाही असे मला वाटते.
ताई बर्फी लवकर सेट होण्यासाठी मी फ्रिजरमध्ये ठेवली. बाहेरही सेट होते पण वेळ लागतो .मोठ्या ताटलीत पसरवून थोडे थंड करून घेऊन, जाडसर वड्या करण्यासाठी छोट्या ताटलीत वड्या थापल्या . मला पातळ वड्या नको होत्या.म्हणून पहिल्या ताटलीत थापल्या नाहीत.मी केलेल्या वड्या खवा घालूनही मऊ झाल्या नाहीत.कोरड्या झाल्या. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.