भजन थोड विस्कळीत झाल आहे सद्गुरू ने बसून मजला संगतल्या गोष्टी # याद नव्हती अंतरा नगर दाखवलं दृष्टी # या नगराची वाट आहे उफराटी # सुईच्या छिद्रातून दाखवली नऊ लाख सृष्टी # तिळा येवडा शिंपला त्या मध्ये सप्त सागर # त्याच्यामध्ये मोती जन्मला गग् गगनाहून थोर # खसखशी एवढा देव देव्हारा गगनाहून मोठा # आजवर मजला ठाऊक नव्हत्या सिद्धांताच्या वाटा # माय नाही बाप नाही जन्मला कैसा # रूप नाही रेखा नाही ओळखावा कैसा # जिकडे पहावे तिकडे माझ्या सद्गुरु चा ठसा # वेडा नागनाथ म्हने धन्य निळकंठा # सत्य सद्गुरु नाथ महाराज की जय