आधुनिक युग हे ज्ञानाचे युग आहे, दिल्ली पासून गल्ली पर्यंत छोट्या दोस्तापासून पासून आजोबा, आजी पर्यंत सर्वांच्या हातात मोबाईल आलेला आहे, विषय कोणताही असो या जगात ज्ञानाचे आदान-प्रदान करण्याचे प्रमुख माध्यम म्हणून युट्युब ओळखलं जात आहे म्हणून ईलेक्ट्रानिक्स सारखा अवघड विषय युट्यूब च्या माध्यमातून मी आपल्या मायबोली भाषेत समजून सांगण्याचा प्रमाणिक प्रयत्न करत आहे. सदरील चँनल मध्ये ईलेक्ट्रानिक्स संबंधीत थेअरी व प्रॅक्टिकल अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगत आहे. या चँनेल मध्ये रोजच्या वापरातील मराठी/हिंदी/ इंग्रजी मधील जो शब्द सोपा वाटेल त्या शब्दाचा वापर केलेला आहे, जेणेकरून संकल्पना समजावी, संकल्पना शक्य तितक्या सुलभ रीतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे, तांत्रिक बाबींमध्ये न अडकता सुटसुटीत व सोप्या भाषेवर अधिक भर दिला आहे.विद्यार्थी, ईलेक्ट्रानिक्स या व्यवसायात काम करणारे व्यावसायिक, अशा सर्वांनाच अत्यंत उपयुक्त ठरणारे व आत्मविश्वास देणारे माझे KAPAWR ELECTRONICS LAB हे युट्युब चँनल! आपण माझ्या चँनल ला भेट दिलात धन्यवाद! असेच सहकार्य राहू देत!