धर्म जागो जनार्धनाचा संपूर्ण विश्वाने ,विश्वासाने आणि आदराने नतमस्तक व्हावे अशी अतिशय दिव्य संस्कृती भारतात आहे.आजही असे दिव्य संस्कार ,दिव्य संत महापुरुष ,दिव्यज्ञान आणि दिव्य ग्रंथावली भारतात सहज सुलभतेने प्राप्त होते हि वस्तुस्थिती आहे.त्याच दिव्यसंत परंपरेतील एक अलौकिक अर्वाचीन महर्षी म्हणजेच निष्काम कर्मयोगी भगवान श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज. जनसामान्यांना जडवादांच्या जीवनदृष्टीतून जागे करण्याचे महतकार्य जनार्दन स्वामींनी जन्मभर जाणीवपूर्वक जोपासलेले आहेत.दिनांक २४ सप्टेंबर १९१४ रोजी महाराष्ट्रातील मराठवाड्यातील पुण्यभूमीत सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या जनार्दन स्वामींचे अंगी श्रद्धा,शुचिता ,अस्मिता,द्या,प्रेम,परोपकर ,क्षमा अशा दैवी गुणांचे दर्शन त्यांच्या बालपणीच्याच आचार -विचारावून सर्वांना समजले होते. स्वामीजींनी प्रथम वारकरी सांप्रदायातील भक्ती प्रेम प्रमेयांची साधना करून अल्पकाळातच पातंजली योग सूत्राचे आधारे योगसिद्ध प्राप्त केली.जटाजूटवल्कलेदारी रुद्राक्ष , भस्म विभूषित अशी त्यागमूर्ती समोर पाहताच पाहणारे नतमस्तक होत.