आपल्या महाराष्ट्राच्या पारंपरिक ठेव्यातला आजुन एक ठेवा लेझीम" जो लेझीम आवडीने खेळतो त्याला तर अवडतेच पण जो खेळताना बघतोय त्यालाही आवडते, हालगीच्या तालावर बेधुंद होवुन लेझीम खेळण्याची बातच वेगळी डायरेक्ट स्वर्गच बरका 😊, पण येवढा सुंदर सोन्यासारखा खेळ आपल्याकड असताना आपली गाबडी,गर्भा दांडिया ,हे असले पांचट होय पांचट,खेळ खेळायला प्राधान्य देतात जोकरा सारखी रंगबिरंगी कपडे घालून स्वताला कुल मणवुन घेतात,आपल्या मराठी लोकांचा एक स्वभाव आहे, दुसऱ्याची परंपरा काहीतरी नविन मनुन अंगी लावुन घ्यायचं,आणि आपली परंपरा जुनी मनुन वाऱ्यावर सोडुन दयायची,आपली मराठी लोकच लय नालायक आहेत ,😊
माझ्या जिल्ह्यातील हा खेळ, फक्त माझ्या जिल्ह्याचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा खूप जुना म्हणजे साधारणतः ८० ते ९० वर्षे जुना खेळ.त्या काळात हाच एकमेव खेळ खेळला जात होता,तेही प्रत्येक सण उत्सवात.