नमस्कार मंडळी, मी प्रिया पवार.साधी गृहिणी आहे.माझ्या स्वयंपाक घरात जे पदार्थ मी तयार करते ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे.मी मालवणी कुटुंबातून आहे.माझे शिक्षण फार कमी झाले आहे.स्वयंपाक देखील मी बघूनच शिकले आहे.पण स्वयंपाकाची खुप आवड आहे.तर कोणताही पदार्थ बनवताना मनापासून केला तरच तो पदार्थ स्वादिष्ट बनतो.असे माझे मत आहे.मनापासून स्वयंपाक करणे आणि केलेला स्वयंपाक प्रेमाने वाढणे याची मला खुप आवड आहे. स्वयंपाक करताना आपण बायका अनुभवाने खुप काही शिकतो.काही वेळा पदार्थ फसतो. पदार्थ फसला तरीही , तो फेकून न देता त्यातूनही आपण नवीन पदार्थ तयार करतो. अन्न वाया न घालवता त्यातून वेगळा विचार करून योग्य पदार्थ तयार करणारी हीच खरी अन्नपूर्णा असते. तर सांगण्याचा उद्देश आहे की मी सुद्धा अशाच छान रेसिपी, माझे आयुष्य कुठेतरी तुमच्याशी शेअर करणार आहे. नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे.माझ्यासाठी सोशल मीडिया हे जग खुप नवीन आहे.काहीच अनुभव नसताना या जगात पाऊल टाकत आहे.
नुसते दिवे नाही समयी सुध्दा पुजतात कारण ती पण घरात असते. आणि मी पण तुझ्या माहेरच्या गावाच्या आजुबाजुला गावातील आहे. आमच्या कडे सगळ्या गावा गावात प्रत्येक घरात केली जाते संपूर्ण दापोली तालुक्यात
प्रिया अ ग रागावू नको हल्ली तुला लगेच राग येतो. पण अमावस्या शनिवार संध्याकाळी 4.30ला चालू झाली रविवारी नाही. रविवारी 4.30ला संपली. पण चालते.दीप पूजा केलीस ना खूप छान झाली पूजा असेच प्रत्येक सण साजरी कर
Jai chi vel campaundchay kadela lavaychi aste kiwa main getvar doni bajune khup chhan diste , khup vadte ti ata paus aahe tar lawa ani jui pan tumi bahutek madech lavleli aahe , navin zhade lavtana kadhi jaga chukte ti pausalyat uptun lavli tari jagtat..
Priya tai ....kiti sunder zaly ....dongar .....solkadi chi easy recipe dakhv na .....ani padval chi bhaji .....if possible....tula vel milel teva ...dakhv .......
Vaghya, Sheru la gharat badhun theva....bibtya firat asel tar...Swanadi sardesai youtuber aahe koknatil tichya kutri var bibtya ne gharat halla kela last week....from London