आजोळ : एक स्वयंसेवी ट्रस्ट संचालित 'माझं आजोळ' हा जगरहाटी म्हणून वृद्धाश्रम असला तरी इथे येणाऱ्या प्रत्येक आजी-आजोबांचं हे हक्काचं घर आहे. बागडणारं बालपण आणि टवटवीत तरुणपण सरल्यानंतर समाधानाचं म्हातारपण हवं असेल तर 'आजोळ'शिवाय पर्याय नाही. इथल्या शब्दकोशात समस्या,अडचणी असे शब्दच नाहीत. इथे संधी आहे सौख्य लुटण्याची, माणसं कमावण्याची, आनंदाची लयलूट करण्याची आणि स्वामीसेवेची.
चला, 'आजोळ'मध्ये आपल्या प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, आपुलकीचं आणि स्वामीकार्याचं रोप लावूया.
अप्रतिम वाचन शैली...आधी तुमचे कौतुक ..आम्हाला साक्षात शंकर बाबांचे दर्शन घडवून आणलेत तुम्ही....मला शंकर बाबा कोण आहेत हे माहिती सुध्दा नव्हते. मला सतत फीड मध्ये त्यांचे फोटो दिसत होते .तेव्हा मला त्यांची खूपच भीती वाटली आणि मी ते बघणे टाळले.पण दत्त भक्त असल्यामुळे कुठल्या ना कुठल्या कारणाने बाबांचा उल्लेख होत राहिला .आणि बाबांचे चरित्र ऐकले. आता तोच फोटो आवडीचा वाटत आहे....thank you very much....तुमचे कार्य असेच चालत राहो ही बाबांच्या चरणी प्रार्थना....