नशिबवान आहेत शिक्षक कर्मचारी ज्यांना तुमच्यासारखे लढणारे योद्धा भेटले, नाहीतर १९ वर्षापासून रखडलेली शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरती बाबतीत कोणी प्रयत्न नाही करत.
एकात्मिक शिक्षण आणि समग्र शिक्षण प्रणाली मध्ये जे आधीपासून शिक्षक कार्यरत आहेत आशा सर्व शिक्षकांची प्रत्येक केंद्रावर निवड होईल ती साधारण 3000 च्या आसपास पद आहेत जी आधीच शिक्षक आहेत आणि उर्वरित 1800 शिक्षक ही टीईटी पास झालेली विशेष मुलांसाठीच्या अध्यापनासाठीचे प्रशिक्षण घेतलेले उमेदवार आहेत यांची निवड केली जाईल हा एक उत्तम निर्णय असून आपण बघतो आहोत बरेच युनिट सुरू आहेत सर्व शिक्षा अभियान अंतर्गत बरेच मोबाईल टीचर आहेत आणि ट्रेनिंग घेऊन घरी बसलेले काही उमेदवार आहेत खऱ्या अर्थाने यांना न्याय मिळेल आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीत मोठी व्यवस्था होईल ही नवीन पदनिर्मिती असल्या कारणाने पूर्वी शिक्षक पद भरतीसाठी मिळालेल्या मंजुरीस कुठलाही धक्का पोहोचणार नाही!