२०१४ साली नृसिंह-जयंती उत्सवांत कीर्तनासाठी जात असताना...पुणे -- नांदेड प्रवासांत श्रीदत्त कृपेने चालू गाडीत मध्ये स्फुरलेलं हे दत्त भक्ती गीत आहे...!!!
गोड आवाज, अभ्यास पूर्ण निरूपण भक्तिरसाने परिपूर्ण आहे. भगवान दत्तात्रेय आपल्या पाठीशी आहेत. आपले कल्याण होवो व दीर्घ आयुरारोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त
नादमधुर आणि तितकीच उर्जा देणारे. चपखल शब्दं, सुंदर सूर, आणि गोड आवाजात गायलंय. तबला टाळ्यांचा उत्तम संगम व टिचक्यांनी बहार आणली. कितीही वेळा ऐका, तितकाच आनंद किंबहुना जास्तीच मिळतो.
खूप सुंदर रचना आहे. अप्रतिम 👌👏👏👏👏👏. अशाच सुंदर रचना भविष्यातदेखील आपणाकडून ऐकावयास मिळतील अशी अपेक्षा आहे. 🙏 असाच दत्तगुरूंचा आशीर्वाद आपणावर कायमस्वरूपी राहो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 🙏
Hari Om Tatsat Om Anusuya Mata ki Jai Hari Om Tatsat Om Atripita ki Jai Avdhoot Chintan Shri Gurudev Datta Digambara Digambara Shripad Vallabh Digambara Om Dram Dattatreya Namah.
श्री अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार, श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी सगुण ब्रम्ह साकार ||१|| तुझे नाम अन् तुझे रूप हे गोड किती आहे, सकल जीवांच्या हृदयांतरी तू पूर्ण भरुनी राहे ॥२॥ दीनदयाघन परमकृपाळू अशी तुमची ख्याती, उत्पत्ती - लय - स्थिती राखसी विश्वंभर श्रीपती ||३|| अनंत जन्मांचे हे माझ्या पुष्य फळा आले, कृष्णातटी- औदुंबर तरुतळी दिव्य चरण पाहिले ||४|| निशी दिनी तुमचे स्मरण घडावे नाम नित्य गाऊं, भक्तवत्सला परम उदारा अंत नको पाहू ॥५॥ अनन्य भावे शरणागत मी देई त्वत्पदी थार, 'श्रीवल्लभ हा अज्ञ दास परि करी त्याचा उद्धार ||६|| अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार, श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी सगुण ब्रम्ह साकार…….