पेटून उठला वनवा सारा तिन्ही जगाना लागली आग।
नसे आसरा नाही निवारा जाऊ कुठे मी सांग विट्ठला।।१।।
आलो शरण तुला भगवंता।
घेई कुशीत तुजा रे भगवंता।।धृ।।
पुण्य झाले स्वस्त जगी त्याला नाही भाव।
नाही थारावसि गुणवंता।।२।।
सत्यवान सावित्रीचा संपला जमाना
वेश्या गिरी चरित्राचा खोटाच बहाना।।३।।
कुंपणच खाई शेत त्याला नाही लाज।
घरचाच राखवला वैरी झाला आज।।४।
Marathi Abhang❤️
15 сен 2024