गीत - सुरेश भट संगीत - अशोक पत्की स्वर - देवकी पंडित चित्रपट - मी सिंधुताई सपकाळ (२०१०) Lyrics - Suresh Bhat Music - Ashok Patki Singer - Devaki Pandit Film - Mi Sindhutai Sapkal (2010)
जितके सुंदर शब्द, तितकेच अप्रतिम, हृदयस्पर्शी संगीत आणि देवकीताईंचा काळजाला हात घालणारा, वेदनेने ओथंबलेला स्वर... सगळेच कित्ती छान जुळून आलेले आहे. तिघांनाही अभिवादन!!
खरंच ही दुनिया पाषाणाची आहे दुःख उराशी बाळगून या पाषाणाच्या दुनियेत मी जगतो आहे,अश्रुं कधी हवेत विरले तर कधी गोठून गेले,थारा ना कुठे कधी कुणाचा सुखी शब्दांना शोधत फिरलो
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या (पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?) मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते याचेच रडू आले की जमले न मला रडणेही मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते (एल्गार) सुरेश भटांची मला आवडलेली रचना: सुरेश भटांची गझल
इतकेच मला जाताना, सुरेश भटांचे शब्द, देवकीताईंचा हृदयाच्या तारा छेडणारा सुमधूर सुस्वर, उत्कृष्ट गीत व संगित, सुंदर जीवनकलाजी, आयुष्याचा सार मांडणारं हे गीत आणि रात्रीचे मुग्ध व संथ वातावरण... सारेच अप्रतिम, अभिजात... 👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खरंच खूप... वेदनामय होतं जीवन.. तरीही त्यांनी कधि हार मानली नाही... आपल्या कर्तृत्वाचा ठसा सतत उमटवत गेल्या... आज जरी त्या आपल्यात नसल्या तरी... त्यांच्या विचारांनी त्या नक्कीच आपल्या सर्वांच्यात आहेत... कोटी कोटी प्रणाम त्या माईला...💐💐💐🙏
माईपदी कोटी कोटी नमन ! माईंचे जीवनच बोधदायी आहे, तरी तो अनुकरणीय बोध आम्ही घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या करीता तर सर्वच जगत असतात, पण दूस-यांसाठी जगणे, तेच खरे जगणे होय !! अनाथांची माय त्रिवार दंडवत !!!
SINDHUTAI, today I listened this song and cried like like a child because I met u in ur Ashram in Hadapsar few years back • U were Mauli of orphans and did lot of sacrifice in life ! Hats Off to U Tai 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Mai.....mi khup miss karte tumhala...tumchi ti ek bhet avismarani ahe ...Itka tras sahan karun suddha tumhi tumche purn life anathan chi mai mhanun jagle....kharach khup udas ani ekte watat ahe..he gane aikun tar hajar vela radle asel mi....khup prashn ahet life madhe..tumchi jivan katha athawun ladhat ahe me....ek prakarchi urja milte mala...pan itka dukh konala devane kadhi deu nahi ki '' marnane keli sutka,jagnane chhalale hote'' ase feel hoeel.Miss u mai..☹☹...
Pooja jas Kabootar ja ja...tas tas swatala full motivate kara ani dukhala, sankatala ja ja... Mhana keep going on... Me nusate sbhadanche bhahar udhalat nahi, or not trying to wordplay... Mana pasun sangatoy
ABHIJEET KOSAMBI Suresh Bhatt yanchi Gazal...hriday ani mann sunna karta. Asa watata aplya varch rachli aahe. Haach tya mahan kavi cha Vijay aahe. Rang maza vegla pan tashich Gazal aahe.