किती किती हुशार आहे माझी बानाई ताई मला माहित नव्हते कठाळ म्हणजे काय तो शब्दही माहित नव्हता त्याचा उपयोग काय माहित नव्हते पण ताई मुळे मला समजले खुप छान कलाकुसर केले सर्वगुणसंपन्न आहे झाडाखाली बसुन मेंढरे राखत किती छान हस्तकला केली God bless you 🙏🌷
बानाबाई तूमचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे सलाम आहे तूमच्या प्रत्येक कामाला,आजकाल कोणीहि ईतके परीश्रम करत नाही,प्रत्येक बाबतित किती सर्व छान समजावून सांगता,किती आवडीने सर्व करता कशाचाही कंटाळा न करता,हसत मुखाने सर्व करत असता त्यामूळे तुमचे विडीओ पाहायला अजून छान वाटते❤️😍😍,काळजी घ्या. जय मल्हार🌺🙏🌺 बाळूमामाच्या नावानं चांग भलं 🌺🌺🙏🌺🌺🕉🔱🚩
अप्रतिम 🌹 आपल्यासारख्या कष्टकरी स्त्रीच्या हातातील ही नाजूक कला , थक्क करून सोडते. अगदी कमी साधनांचा वापर करून मिळालेल्या थोड्या वेळात सुंदर कलाकृती निर्माण केलीत. 🌹🙏🌹
वहिनी तुम्ही किती हुशार आहात.टेलरलापण जमणार नाही असं काम केलं तुम्ही. भटकंती करुन जगतानासुद्धा त्या जगण्यात आनंद भरता.मला तुमचे व्हिडियो खूप आवडतात. कमीतकमी सामानात छान, स्वच्छतेने नीटनेटका संसार करता.खरंतर मला तुम्हाला भेटायचं आहे.बघू.
खरं च खूप छान आहे मी सुध्दा लोकरीचे विणकाम भरतकाम स्वेटर मफलर मोजे झबले टोपी करते पण अशी कारागीरीपहिलांदापाहिली, खूप खूप धन्यवाद, अश्या नवीन नवीन वस्तू चे विडयो पाठवा
कठाळ म्हणजे काय हे माहित नव्हते ताई तुमच्या मुळे कळले ताई तुम्ही किती हुशार आहात शहरातील लोकांना माहिती त नसलेला प्रकार दाखला तुमच्या समाजातील विविध प्रकार वस्तू व बोलीभाषेतील शब्द प्रयोग पाठवा,