कशी तुज समजावू सांग का भामिनी उगिच राग ? हास्याहुन मधु रुसवा हेमंती उष्ण हवा संध्येचा साज नवा हा का प्रणयानुराग ? चाफेकळी केवी फुले ओष्ठ-कमल जेवी उले भोवती मधुगंध पळे का प्रसन्न वदन राग ? वृत्तींचा होम अमुप त्यात जाळू गे विकल्प होवुनिया निर्विकल्प अक्षय करु यज्ञ-याग ओठांचे फेड बंध गा इकडे मुक्तछंद श्वासांचे करू प्रबंध हृदयांचे मधु प्रयाग