. !! #जय_गजानन !! गजानन गुरू तू तारण हारी, दर्शन दिले मज शेगांव नगरी,, रम्य सुंदर मंदिर संगमरवरी, तेजोमय मुर्ति असे साक्षात्कारी,, प्रसन्न शांत असे परिसरही, राहुनी तुझ्या चरणीं आसरी,, बसुनी तिथे जपता विठ्ठल हरी, मुखी भजन गण गण निरंतरी,, भासे मज मी असे स्वर्गाच्या दारी, वाटलें न जावें कधीही माघारी,, भक्ती नित्य घडो प्रार्थना जोडून करी, सदैव असो वरदहस्त आम्हां सर्वांच्या शिरी,, गण गण गणात बोते,, जय गजानन माऊली,, जय गजानन,, 🙏🙏🙏🙏 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷