Тёмный

जिथे "महादेव" नांदतो| कातळात कोरलेले "विमलेश्र्वर मंदिर"| Vimaleshwar Temple Devgad Waada 

Konkani Ranmanus
Подписаться 483 тыс.
Просмотров 33 тыс.
50% 1

निसर्गसंपन्न कोकणच्या देवभूमीत विविध कलाविष्कारांनी युक्त अशी मंदिरं असणं, हे या भूमीचं विशेष वैशिष्टयं आहे. देवगडपासून साधारण १५ कि. मी. अंतरावर आणि विजयदुर्ग पासून 18 कि.मी. अंतरावर वाडा हे डोंगराच्या कुशीत, वनराईत वसलेलं एक समृद्ध गाव.
या गावापासून 1 कि.मी. अंतरावर किंवा वरील मार्गावरील विमलेश्वर मंदिर थांबा येथून अर्धा कि.मी. वर फणसे -पडवणे जाणा-या रस्त्याला लागूनच श्री देव विमलेश्वर मंदिर आहे. येथून काही अंतरावर सुंदर पडवणे सागरकिनारा आहे. संपूर्ण उत्तम डांबरी रस्ता आहे.
डांबरी रस्त्याजवळच असणाऱ्या भव्य कमानीतून मंदिर परिसरात येताना येथील निरव शांतता मनाला स्पर्शून जाते. सुरुवातीलाच काळभैरव गुंफा असून शेजारीच गणपतीची सुंदर मूर्ती आहे. यानंतर दिसते ते विमलेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर वटवाघळांचा आवाज, अपुरा प्रकाश याच बरोबर असणारी गूढ शांतता यामुळे मंदिराच्या प्राचीनतेची अनुभूती येते.
बऱ्याच शिवमंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये काहीशा खोलगट भागात शिवपिंडी दिसून येते. मात्र या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये पायऱ्या चढून जावे लागते, तर शिवपिंडी गाभाऱ्यात उंच भागी आहे. हे एक या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. हा मंदिर परिसर म्हणजे पूर्ण एकसंघ शिला आहे. विमलेश्वर मंदिर हे पांडवकालीन असल्याचा इतिहास आहे. एकसंघ असणाऱ्या या शिलेत पाच पांडवानी एका रात्रीत मंदिर कोरले, अशी या मंदिर निर्मितीची आख्यायिका सांगितली जाते. आजही मंदिराच्या शिखरावर दर्शनभागी दिसणारी पाच पांडवांची शिल्पे या आख्यायिकेला जणू पुष्टीच देत आहेत.
श्री विमलेश्वर मंदिर जांभ्या दगडाच्या गुहेत असून असून गाभारा, सभागृह व गॅलरी अशा तीन टप्प्यात ही गुहा कोरलेली आहे. गाभा-यामध्ये शिवलिंग असून मंदिरासमोर भव्य अंगण आहे. अंगणापासून मंदिराची उंची सुमारे 60 ते 65 फूट आहे. मंदिराच्या दर्शनी मध्यभागावर पाच मानवरूपी नग्न शिल्पे कोरलेली असून गुहेच्या दोन्ही बाजूला माहुतासह दोन हत्ती कोरलेले आहेत. अंगणातून देवळात प्रवेश केल्यावर प्रथम गॅलरी लागते. तेथे एक मोठी घंटा टांगलेली आहे. त्याच्यापुढे कातळावर 35 फूट रूंद व 15 फूट उंच असे सभागृह आणि त्याच्या बाजूने नक्षीकाम केलेले मोठेमोठे खांब आहेत. तेथून थोडया पाय-या चढल्यानंतर साडेसहा फूट उंच 16 फूट रूंद, 16 फूट लांब असा गाभारा लागतो. त्याच्या मध्यभागी शिवलिंग आहे. अशा प्रकारचे उंचावर शिवलिंग असणारे हे एकमेव मंदिर आहे. एकूणच मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण दिसून येते. मंदिर परिसरात काळ्या दगडी पाटांवरती विविध कोरीव शिल्पे आढळून येतात. संपूर्ण मंदिर म्हणजे कोरीव लेण्याचा समुदायच म्हणावा लागेल.
मंदिरातील शिवपिंडावर दररोज अभिषेक केला जातो. अभिषेकासाठी वापरले जाणारे पाणी, दुध, निर्माल्य झालेली फुले इ. शेजारच्या डब्यात टाकले जाते. ती तेथेच मुरतात परंतु त्यातील पाण्याचा अंश अजिबात बाहेर जात नाही, ही बाब आश्चर्यकारक आहे.
मंदिरासमोर पाण्याचा अखंड झरा वाहतो. या पाण्याचा अद्याप उगम समजू शकलेला नाही. येथील मंडळी या निर्मळ झऱ्याचे पाणी पिण्यासाठी वापरतात. घनदाट वनराईमुळे येथील पाणी उन्हाळ्यात थंडगार असते. तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ते उबदार असते. मंदिराच्या दोन्ही बाजूला काळभैरव गुहा आहे.
रस्त्यावरून मंदिराचा फक्त कळस दिसतो. मात्र प्रत्यक्षात पाय-या उतरून अंगणामध्ये जाऊन पाहिल्यास मंदिराच्या भव्यतेची कल्पना येते. येथील घनदाट वनराई, रम्या आणि शांतता मनमोहून टाकते. शांत सुंदर अशा या मंदिरात शिवरात्रोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. या दिवसात रोजरात्री प्रवचन, ढोल, ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत शिस्तबद्ध पालखी प्रदक्षिणा, यानंतर कीर्तन असा अभूतपूर्व सोहळाच संपन्न होतो. शिवरात्रीदिवशी मोठी यात्रा भरते.
नवसाला पावणारा विमलेश्वर अशी या देवस्थानाची सर्वदूर ख्याती असल्याने विविध ठिकाणाहून भाविक येथे दर्शनासाठी येतात..
सुंदर शिल्पकला आणि त्याच्या जोडीला रम्य निसर्ग आणि मानवी बुध्दी यांचा सुंदर मिलाप असलेले हे स्थळ पर्यटन दृष्टया अतिशय उत्तम स्थळ आहे.

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 231   
@pratiktawde2586
@pratiktawde2586 3 года назад
आमचं कुलदैवत😍...खूप छान व्हीलॉग😍
@machindrapatil5692
@machindrapatil5692 3 года назад
☘️☘️☘️☘️☘️
@Santoshbandagi81
@Santoshbandagi81 3 года назад
Nice presentation. I will visit this place from Gujarat
@maheshparab1698
@maheshparab1698 3 года назад
अप्रतिम बोलत देवगड बदल 🙏
@kavitaredkar3419
@kavitaredkar3419 Год назад
THANK YOU SO MUCH 🙏🌹🇮🇳
@pallavikamble9810
@pallavikamble9810 3 года назад
प्रसाद खूप सुंदर वर्णन केले आहे तुम्ही, कोकणातील स्वर्गीय प्रवास तुमच्या व्हिडीओ च्या माध्यमातून घरबसल्या खरोखरच स्वर्गीय ठरत आहे...👌❤️ प्रत्यक्षात या ठिकाणाला नक्कीच भेट देऊ...😊
@sanjaypalande5845
@sanjaypalande5845 3 года назад
तुझं प्रस्तुतीकरण खूप सुंदर आहे तुझं लेखन खूप छान आहे आणि तुझं कोकण वरील वात्सल्य हे एक एक शब्दातून व्यक्त होते खूप छान तू असाच निरागस रहा आणि खूप खूप यशस्वी हो दव भले करो
@shitalmane7674
@shitalmane7674 3 года назад
श्रावण महिन्यात विमलेश्वराचे या व्हिडिओ मुळे दर्शन घेता आले . खुप खुप धन्यवाद
@shejouavach
@shejouavach 3 года назад
विमलेश्वर मंदिर व परिसराचे घडवलेले दर्शन खूप सुंदर. आवाज/निवेदनही छान.
@deepamore7603
@deepamore7603 3 года назад
खूप सुंदर आहे vimaleshwar मंदिर.. निसर्गाच्या कुशीत वसलेले अणि पूर्ण पणे नैसर्गिक .. मनापासून प्रणाम त्या पुण्य पूर्वजांना ज्यानी निसर्गाच्या प्रति अशी प्रार्थना स्थळे बांधली.. नक्की ch भेट द्यायला हवी!!🤗👍😀 Thank you Prasad 😊
@KokanVista
@KokanVista 3 года назад
आजूबाजूचा निसर्ग रम्य परिसर... आणि त्यात वसलेलं विमलेश्वर मंदिर... खूप छान👍👌
@archanaraut8878
@archanaraut8878 3 года назад
हे आमच्या अत्याच गाव पण कधीच जाता आल नाही पण तुझ्या मुळे पहाता आल खूप खूप सुंदर वीडियो धन्यवाद 🙏🙏👍👍👌
@pritisawant6947
@pritisawant6947 3 года назад
अशा स्थळांना भेट देताना, त्यांची माहिती मिळाली तर ती स्थळ अजून छान समजतात. पूर्ण दर्शन तेव्हाच होते. कोकणी रानमाणसाचे धन्यवाद!
@ushakher9241
@ushakher9241 3 года назад
खूपच सुंदर निसर्गरम्य परिसर दाखवलात तुम्ही . जणू भारतातली प्रत्येक नदी ही गंगाच आहे. व ती शंकराच्याच जटेतून बाहेर पडते आहे.असे भारतीयांना वाटत असते. नद्यांच्या नावात गंगा हे नाव येते. जसे सोमगंगा , पंचगंगा , पाताळगंगा . व त्या भागातील लोकांच्या प्यायच्या पाण्याचा व वापरायच्या पाण्याचा मुख्य स्रोत तेच पाणी असते. व म्हणूनच ते पुजले जाते.👌👌
@prathameshpanaskar3445
@prathameshpanaskar3445 3 года назад
Bhau.. Mstch... 🤩
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 года назад
Swargiy. Sundar. Konkan ❤
@mangeshgawde911
@mangeshgawde911 3 года назад
ख़ुप सुंदर... प्रसाद, तू जे वर्णन करतोस, ते एकदम अप्रतिम असतं....👌👍
@nutanmanjarekar4075
@nutanmanjarekar4075 3 года назад
Thank you so much दादा तुम्ही आमचा गावी गेलात आज आम्ही मुंबई मध्ये राहून पण आज फक्त तुमच्या मुळे विमलेश्वराचे दर्शन घेता आल खरंच खूप खूप धन्यवाद 💓💓❤️🙏🙏🙏
@Prarthana1507
@Prarthana1507 3 года назад
Khup chan video... ghari bslya darshan zal .... good voice bro... ekhadya natane edit kelyasakh vattoy.. 🤗👍
@6_t_ngaming562
@6_t_ngaming562 3 года назад
किती सुंदर मन शांत करणार मोहून टाकणारे पवित्र वातावरण, प्रसन्न करणार वातावरण आल्हाददायक
@mayurid1120
@mayurid1120 3 года назад
Khuup sundar aahe. .. ikde yenyacha yog yog julun yeu de deva 🙏🙏🙏🌸🦋. ..ashi prarthana 🌺🙏
@sharadjoshi1860
@sharadjoshi1860 3 года назад
Khupach sundsr thikan aahe. Tumachi sambhadit mahiti denyachi padhat utkrushta aahe. 👍
@marathiagrotechOfficial
@marathiagrotechOfficial 3 года назад
दादा मी व्हिडिओ पहातो पण त्या आधी 👍🏻 लाईक करून घेतो कारण हे सुंदर दृष्य पाहून ❤️
@indiaismycountry6722
@indiaismycountry6722 3 года назад
कोकणातले असे पर्यटक जागा प्रसाद दा मुले अनुभवाला मिळतात थॅक्स प्रसाद दा ....
@vishalkadam1402
@vishalkadam1402 3 года назад
Jay Ho Bhole Ki Bhole Bhole Tum Bin Kohi Na Bole
@rekhamhatre2532
@rekhamhatre2532 3 года назад
When ever I visit my native place I always take the darshan of lord vimaleshwar , it's a beautiful place I am proud of it, congratulations Prasad for making this wonderful vlog 🙏👍
@subhashgawde3320
@subhashgawde3320 3 года назад
प्रसाद,तुझे धन्यवाद, प्रत्येकाच्या पसंती पडेल असा निरव शांत आणि सुंदर परिसर आहे, देव तुझे भले करो. 🙏🙏
@vinishamainkar6843
@vinishamainkar6843 3 года назад
Video paahunach mann prasanna hote tar tithe gelyavar kas vatel🥰🥰🥰🙏Thank you Prasad 🙏👍
@pranalijadhav1785
@pranalijadhav1785 3 года назад
अप्रतिम.....निसर्ग🌿🍃 सौंदर्य😍💓 सुंदर... पांडवकालीन विमलेश्वर मंदिर उत्कृष्ट. . मंदिराची संपूर्ण माहिती, निवेदन, सादरीकरण. धन्यवाद ...प्रसाद 🙏😘💕
@minaltamhane9730
@minaltamhane9730 3 года назад
Khup masta Shravani somvari vimleshwar mandir darshan zale.Surekh mahiti aani chitrikaran.
@hareshrane2061
@hareshrane2061 3 года назад
प्रसाद तुझ्यामुळेच खरं कोकण काय आहे आणि त्याचा अर्थ काय आहे ते आम्हाला समजले आहे तुझा आवाज खूप सुंदर आहे😍
@ujwalakulkarni1502
@ujwalakulkarni1502 3 года назад
खूप सुंदर vdo मस्त वाटलं. धन्यवाद
@rohanvartak3136
@rohanvartak3136 3 года назад
||om namaha shivay|| Thnxx bhava for d video
@padmajaparab6172
@padmajaparab6172 3 года назад
Khup sundar👍👌
@abhijeetpatil3756
@abhijeetpatil3756 3 года назад
जिथे स्वर्ग तिथे देव आणखी माझा स्वर्ग म्हणजे आपल कोकण म्हणून च आजपर्यंतची माझ्या सगळ्या फक्त आणि फक्त कोकणातच झाल्यात.
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 3 года назад
मंदिर खूप छान आहे आजूबाजूचा परिसर हे बघण्यासारखा आहे.
@aditidahivalkar8873
@aditidahivalkar8873 3 года назад
विमलेश्वर मंदिर अप्रतिम आहे.दादा तू जे काम करतो ना ते खूपच अभिमानास्पद आहे.आपल्या कोकणचं सौंदर्य ज्या पद्धतीने वर्णन करतो ना ते खूपच मनाला मोहित करणार आहे.👍👍👍
@babanbodekar7130
@babanbodekar7130 3 года назад
सुंदर स्थळ आणि तितकेच सुंदर वार्तांकन!👌
@pitambarpatil7110
@pitambarpatil7110 3 года назад
Starting cha drone shot ani Vimaleshwara che mandir 👌👌👌
@sunitasonar890
@sunitasonar890 3 года назад
🙏 mast
@aabavinayak4033
@aabavinayak4033 3 года назад
कोकण खुपच अविस्मरणीय आहे.विमलेश्वर,रामेश्वर,कुणकेश्वर,दाभोळे गणपती मंदिर सर्व अगदीच स्वर्गीय
@rajanpawar2941
@rajanpawar2941 3 года назад
खुप सुंदर ठिकाण , देवस्थान 🙏
@shaileshkadam650
@shaileshkadam650 3 года назад
हर हर महादेव भोलानाथ सबकेसात 🌹🙏
@ashishsurvevlogs1030
@ashishsurvevlogs1030 3 года назад
Nice video... देवरुख येथे मालेश्वर मंदिर आहे. तेथे नक्की visit दे. जि. रत्नागिरी ता. सगमेश्वर व्हा. देवरुख. तुला साखरपा वरुन जवळ आहे.explor करायला खुप छान आहे.मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ देवरूखपासून १७ किमी अंतरावर आहे. मार्लेश्वर हे एक शंकराचे मंदिर असून ते सह्याद्री पर्वतात प्राचीन गुहेत आहे. मार्लेश्वर हे एक जागृत शिवलिंग आहे, असे सांगितले जाते. गुहेला लागूनच प्रसिद्ध बारमाही धबधबा आहे.
@supriyabhostekar345
@supriyabhostekar345 3 года назад
खुप सुंदर मंदिर आहे 🚩🙏🏻🤗
@sanjaykedar9222
@sanjaykedar9222 3 года назад
आज श्रावणी सोमवार...श्री क्षेत्र विमलेश्वराचे दर्शन झाले...खुपच सुंदर मंदीर परिसर व वर्णन...खरोखरच स्वर्गीय कोकण...
@ashokyeragi5715
@ashokyeragi5715 3 года назад
अप्रतिम सुंदरता विलोभनीयच सगळं मनाला भुरळ घालणार
@ParagKokane
@ParagKokane 3 года назад
विमलेश्र्वर मंदिराचा व्हिडिओ मस्त आहे. वाडा हे माझ्या आईचं गाव, अनेक वर्षात जाणं झालं नाहीये. बघून छान वाटलं. 👌🏻
@snehalt4548
@snehalt4548 3 года назад
Aatishay sunder vimleshwar mandir Tuze kavya aani varnan tar khuch bhari khup sunder 👌👌👌🙏🙏
@dilipjoshi996
@dilipjoshi996 2 года назад
अप्रतीम वर्णन.👌👌👌
@dharmajithakur4218
@dharmajithakur4218 3 года назад
सुंदर.मंदिर.माहीतच.नव्हत.जरूर.पाहणार. धन्यवाद.प्रसाद.
@raginishet6147
@raginishet6147 3 года назад
खुप छान निसर्ग, देवा तुझे किती, सुंदर आकाश, कविता, पहिलीची आठवणं आली, सुंदर 👌👌👌
@nileshs.amberkar3160
@nileshs.amberkar3160 3 года назад
Nice presentation dear, Om Vimaleshvarai Namah,Thanks.
@savitabadhe5519
@savitabadhe5519 3 года назад
Thanks for such beauty.
@yashwantparkar2634
@yashwantparkar2634 3 года назад
विमलेशवर मंदिर अप्रतिम
@jayshreebhalerao9046
@jayshreebhalerao9046 3 года назад
किती सुंदर ठिकाण , मनाला हवीशी वाटणारी शांतता 🥰👌👌🙏
@rohitposarekar6498
@rohitposarekar6498 3 года назад
Mazhya aai che gaav🙏 vada
@samitashelar2781
@samitashelar2781 3 года назад
खूप सुंदर अविस्मणीय,🙏🏼🙏🏼
@janicedcunha9092
@janicedcunha9092 3 года назад
फार सुंदर , वाह! So proud of our State, nature is beyond beautiful words. Awesome video, thanks for sharing God's creation with us, 👍👍💕💕💕💕🌟🌟🌟🌟
@ashokjadhav8326
@ashokjadhav8326 3 года назад
अतिशय सुंदर. ओम् नमःशिवाय.
@varma9602
@varma9602 3 года назад
खूप छान वर्णन. ....सादरीकरण मस्तच. ..दादा खूप छान. .
@sudhirtambe3300
@sudhirtambe3300 3 года назад
फार सूंदर व प्रसन्न वातावरण. छान व्हिडीओ.
@namdevbhise2860
@namdevbhise2860 3 года назад
दादा एक नंबर कविता करतोस भारी विडियो आहे,
@vinaykhare2537
@vinaykhare2537 3 года назад
परत परत भेटीची ओढ लावणारे अतिशय प्रसन्न आणि आध्यात्मिक स्पंदने निर्माण करणारे ठिकाण.. आपण उत्तम मांडणी केली आहे.. छान.. 🙏🙏💐👌
@shashikalapatil6153
@shashikalapatil6153 3 года назад
अतिशय सुंदर
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏 सुंदर वर्णन केले आहे तुम्ही 🙏🙏🙏🙏
@siddheshphansekar8011
@siddheshphansekar8011 3 года назад
प्रसाद खुप खुप आभार तुझे विमलेश्वर मंदिर इतक्या छान पद्धतीने कव्हर केल्या बद्दल...खरंच एक वेगळी अनुभूती होते जेव्हा केव्हा आम्ही विमलेश्वर देवा च दर्शन घेतो🙏...
@milindtawde7889
@milindtawde7889 3 года назад
हेच ते सुख जे सगळे शोधत फिरतात.
@rkarekar07
@rkarekar07 3 года назад
अप्रतिम, सुंदर मंदिर, खूप छान वर्णन
@HarshalSanchit
@HarshalSanchit 3 года назад
शरीर साथ देत नाही म्हणून काय झालं प्रसाद मुळे आम्हाला घर बसल्या स्वर्ग अनुभवायला मिळतो म्हणून प्रसाद तुझे खुप सारे थनयवाद .🙏🙏🙏🙏🙏
@sheetalkaralkar7428
@sheetalkaralkar7428 3 года назад
खूप छान 💞 तुझी ती बोलण्याची पद्धत खूप आवडते .
@shamchavan8410
@shamchavan8410 3 года назад
खुप सुंदर मंदिर आहे
@devikamhatre74
@devikamhatre74 3 года назад
खूपच सुंदर आहे सर्व
@kkg2241
@kkg2241 3 года назад
Nisargdaivat 😍😍🐯🌴🌴
@amitmalkar9484
@amitmalkar9484 3 года назад
chhan varnan .....prasad.
@janhavisawant8630
@janhavisawant8630 3 года назад
👌👌👍
@ajaydarde9588
@ajaydarde9588 3 года назад
खरं जगण्याचा आनंद तू घेत आहेस
@shraddhasawant4302
@shraddhasawant4302 3 года назад
माझ्या मामाचं गाव❤️
@varshmame4315
@varshmame4315 3 года назад
कवीता सादरीकरण खूप छान केलस. ...तुझ्या मेहनतीला तळमळीला नक्की यश येईल
@smitachavan3655
@smitachavan3655 3 года назад
छान निसर्गाचे सौंदर्य बघून मन तृप्त झाले प्रसाद तुझ्या मुळे आम्हाला हे पहावयास मिळते तुझे व्हिडीओ छान. आसतात 🙏👌👌
@umaambe4393
@umaambe4393 3 года назад
खूपच सुंदर
@saxophone...
@saxophone... 3 года назад
खुप छान निसर्ग ,सुरेख देऊळ 👌👌🙏
@travelwithfamili
@travelwithfamili 3 года назад
खूपच सुंदर वर्णन ☺️☺️
@milindphadke104
@milindphadke104 3 года назад
SUNDARACH
@geetanjalitaide1029
@geetanjalitaide1029 3 года назад
Khupch sunder, apratim vimleshwar mandir. Chaan sadarikaran. Dhanywad!
@ashokkumbhar8247
@ashokkumbhar8247 3 года назад
फारच सुंदर😍💓 देवगड हिंदळे मोर्वे येथील स्वर्गीय निसर्गाचे चित्रिकरण करावे. हिंदळे गाव म्हणजे विलोभनीय निसर्गच!!!
@GauravVichare
@GauravVichare 3 года назад
खरच या मंदिराच्या जवळ वेगळच वातावरण आहे, शांत वाटत. असच एक निसर्गाच्या अगदी जवळ बांधलेलं मंदिर म्हणजे पोखरबाव गणपती मंदिर. देवगड पासून १० कीमी लांब आहे. चक्क पाण्याच्या प्रवाहावर बांधलेलं मंदिर. देवगड ला जर येणार असाल तर कुणकेश्वर सोबत ही दोन मंदिर सुद्धा नक्की पहा.
@opskman6660
@opskman6660 3 года назад
😃😍😍👍👌 Yes
@poojashelar6047
@poojashelar6047 3 года назад
👍🙏
@kundankargutkar
@kundankargutkar 3 года назад
स्वर्गीय अनुभूति साठी, मनःशांतीसाठी पुन्हा पुन्हा जावे असे, देवगड मधील एकमेव निसर्ग संपन्न देवस्थान म्हणजे विमलेश्वर मंदिर !
@satishbhalerao2821
@satishbhalerao2821 3 года назад
अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभलेले कोकण आणि तुझे सुंदर निवेदन यामुळे आम्हाला देखील आम्ही तुझ्या सोबत तिथे फिरत आहोत की काय असा भास होतो.. केवळ अवणॆनीय
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 3 года назад
खुप सुंदर आहे
@sharvarikadam7441
@sharvarikadam7441 3 года назад
आमच्या देवगड मध्ये स्वागत दादा.
@vilaskubal6954
@vilaskubal6954 3 года назад
प्रसाद , अप्रतिम लोकेशन , आणि तितकेच अप्रतिम चित्रण , आणि हिरवा गार निसर्ग 👌👌👌👌 प्रत्येक व्ही डी ओ निश्चितच काहीतरी वेगळे दाखवून जातो , धन्यवाद मित्रा 🙏🙏🙏🙏
@madhavpatil4853
@madhavpatil4853 3 года назад
Madhav patil dist Latur 🌹💐 khup sundar najara aahe dada kokanat ahe as vatayla laglay dada 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🙏🙏🙏🙏🙏
@anandmule8627
@anandmule8627 3 года назад
अतिशय नयनरम्य स्थान. माहिती बद्दल धन्यवाद.
@namdevshelake9228
@namdevshelake9228 3 года назад
अप्रतिम सौंदर्य 👌🏻🤩
@pranalitukrul8797
@pranalitukrul8797 3 года назад
जय विमलेश्वर
@shubhamkatore3590
@shubhamkatore3590 3 года назад
Nice
@sunitajoil9971
@sunitajoil9971 3 года назад
खूप सुंदर मंदिर आज सोमवार छान दर्शन घ्यायला मिळालं 🙏
Далее
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Просмотров 26 млн
🤔Угадай постройку | WICSUR #shorts
00:59
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Просмотров 26 млн