Тёмный

टेन्शन आलंय का मित्रा तुला ?, थोडे हसून तर बघ.... 

Ulhas Kotkar
Подписаться 128 тыс.
Просмотров 193
50% 1

टेन्शन आलंय का मित्रा तुला ?, थोडे हसून तर बघ....
डब्यात गेले ते टेन्शन, असे एकदा म्हणून तर बघ...
नाही जमले काहीच तर, उठ आणि थोडा नाचून तर बघ...नेहमी पेक्षा काहीतरी आगळे, नेहमी पेक्षा काहीतरी वेगळे करून तर बघ....
टेन्शन आलंय का मित्रा तुला ? थोडे हसून तर बघ....
टेन्शन आहे ते, टेन्शन द्यायला ते येणारच..
मागे काय घडले, पुढे काय होणार या विचाराने ते गोंधळणारच..
जाऊदे तू रात्री शांत झोप घे, सकाळी उठ.. फ्रेश हो... न्यूजपेपर मोबाईल हातात घे राशींभविष्य बघ... काय लिहिलं त्यात हे जाणून तर बघ..
होणार काहीतरी वेगळे आज, येणारच चांगले दिवस लवकरच... लिहलं आहे त्यात ते जरा मानून तर बघ...
रियालिटी आहे काही तरी वेगळी, लिहले त्यात काहीतरी वेगळे, कन्फयुजन झालं जरा.. अरे भाई कहना क्या चाहते हो.. असे त्याच राशींभविष्याला टेन्शनने विचारून तर बघ..
टेन्शन आलंय का मित्रा तुला ? तर जरा हसून तर बघ..
टेन्शन आहे ते, टेन्शन द्यायला ते येणारच... घेतलेल्या लोणचे emi कशे भरायचे, मुलांच्या शाळेच्या फीस चे काय, इतकंच काय तर रुसलेल्या प्रियसीला कसे मनवायचे या विचाराने मन गांगरनारच..
जाऊदे... ते थोडा ब्रेक घे.. मोटिवेशनल पिचर बघ, जमलंच तर युट्युब वर मोटिवेशनल व्हिडीओज बघ...
संदीप महेश्वरी, विवेक बिंद्रा काय सांगत आहेत ते जरा ऐकून तर बघ...कोशिश करणे वाले की हार नाही होती, डर के आगे जीत होती है... ते हे सांगताय त ते काय ते समजून तर बघ..
दोन तीन दिवस तरतरुण मोटिवेशन मद्धे जगून तर बघ... होत कसे नाही आता असे एकदा म्हणून तर बघ..
च्यायला... आज ढूस तर उद्या फुस्स होतंय...आज आहे जबरदस्त उत्साह पण उद्या सर्व गलपटून जातंय...त्या गडबडणाऱ्या मोटिवेशनचे पुन्हा वेगळे टेन्शन घेऊन तर बघ
टेन्शन आलंय का मित्रा तुला? थोडं हसून तर बघ...
टेन्शन आहे ते, टेन्शन द्यायला ते येणारच..
निवडणुका जवळ येतायत कोण जिकणार कोण हरणार, कोण कोणास काय म्हणाले व काय कोणास काय म्हणाले हे वाचून पाहून... भलेभले प्रश्न पडणारच..
जाऊदे.. तू वोटिंग कार्ड काढलं नसेल तर काढून तर बघ... वोटिंग च्या मतदान नक्की करून तर बघ... सोडवणार ते सर्व आपले प्रॉब्लेम व प्रश्न.. ते आमदार खासदार काय सांगतायत त्यावर विश्वास ठेवून तर बघ...
निवडणुका संपतील, जींकणारे जिंकतील.. देश घडवण्यात माझा देखील वाटा आहे हा अभिमान बाळगून तर बघ...
च्यायला... पण माझी अडकलेली गाडी तिकडेच आहे... आयुष्य तेच आहे आणि हाच पेच आहे... त्याचे पुन्हा नवे टेन्शन तर घेऊन बघ...
टेन्शन आलंय का मित्रा तुला? थोडं हसून तर बघ...
टेन्शन आहे ते, टेन्शन द्यायला ते येणारच...
आयुष्य भर हा टेन्शन चा ग्राफ वर खाली होत राहणारच...
जाऊदे... तू ज्या देवाला मानतो त्या देवाला मनापासून हात जोडून तर बघ... मित्र असतील मैत्रीण असतील त्यांच्याकडे मनमोकळे बोलून तर बघ...
नाहीच मिळणार कदाचित काही सोल्युशन, समजून घेणार नाही कदाचित तुझे कोणी इमोशन्स..
शेवटी आई वडिलांच्या पाया जवळ एकदा बसून तर बघ... नसतील आई बाबा जवळ तर त्यांचे आशीर्वाद एकदा आठवून तर बघ...
च्यायला... नाही तुझे टेन्शन चे टेन्शन पळते की नाही... हे एकदा अनुभवून तर बघ...
टेन्शन आलंय का मित्रा?, थोडे हसून तर बघ....
डब्यात गेले ते टेन्शन, असे एकदा म्हणून तर बघ...
नाही जमले काहीच तर... उठ आणि थोडा नाचून तर बघ...नेहमी पेक्षा काहीतरी आगळे, नेहमी पेक्षा काहीतरी वेगळे करून तर बघ...
टेन्शन आलंय का मित्रा? थोडे हसून तर बघ..
मोडतोड कवी : उल्हास कोटकर

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
Просмотров 295 тыс.
小丑调戏黑天使的后果#short #angel #clown
00:16