नवरात्रीसाठी सोपी शस्त्रोक्त साधना. A simple Navaratri ritual.
काही मह्त्त्वाची माहिती
उपासनेचे दिवस : ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज ही नामावली म्हणावी. नवरात्र, किंवा पंचमी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावास्या या तिथी, किंवा शुक्रवार, मंगळवार आणि रविवार हे वार देवीच्या नैमित्तिक उपसनेसाठी प्रशस्त आहेत.
कसे बसावे : साधकाने पूर्व किंवा उत्तरेला तोंड करून उपासना करावी.
संकल्प : कुलदेवतेच्या कृपेने माझे व माझ्य कुटुंबाचे कल्याण व्हावे यासाठी दुर्गा अष्टोटोत्तरशत नामावलीद्वारे सेवा करीत आहे.
ध्यान : देवीचे चिंतन करावे.
मानसपूजा : गंध, फुले, धूप, दीप, नैवेद्य आणि तांबूल(विडा) या गोष्टी देवीला मनाने अर्पण करणे. लम् पृथ्वात्मकं गंधं कल्पयामि असे ६ मंत्र म्हटलेले आहेत.
कुंकुमार्चन : जुन्या ग्रंथात केशराला कुंकुम म्हटले आहे. सामर्थ्य असल्यास केशर वाहून अर्चना करावी. अथवा हळदीपासून केलेले शुद्ध कुंकू उपयोगात आणावे. वरील एकशे आठ नावे ऐकत अंगठा, मधले बोट आणि चौथे बोट यांच्या चिमटीने कुंकू वाहावे. अथवा अंगठा आणि अनामिका(चौथे बोट) यांनी केशर वहावे.
केशराचा प्रसाद नंतर खाण्यात वापरावा. कुंकू घरातील माणसांनी लावावे अथवा विसर्जन करावे.
पुष्पार्चन : जास्वंद, लाल कणेर, गोकर्ण, कमळे/ कमळ पाकळ्या, लवंग, बेल, सुवासिक फुले वाहणे.
धान्यार्चन : अक्षता, लाह्या, मखाणे, वाराप्रमाणे त्या त्या ग्रहाचे अखंड धान्य.
फल अर्चना: ओल्या किंवा सुक्या खोबर्याचे तुकडे, ताजी द्राक्षे, आवळे, वेलची, लवंग, बेदाणे, बदाम, सुक्या मेव्यापैकी अखंड जे काही मिळेल ते वाहणे.
Important information
Suitable days : This Namavali sadhana can be done daily if one wishes. Otherwise Navaratri, Panchami, Ashtami, Navami, Chaturdashi, Poornima, Amavasya Tithis or Fridays, Tuesdays and Sundays are suitable days for worshipping Devi.
How to sit : Facing east or north.
Sankalp : May our Kuladevata be pleased by this worship with Durga Ashtottarashata Namavali and Bless me and my family with well being.
Dhyanam : Meditate on the Devi
Manasapooja : Mentally offer sandal paste, flowers, incense, lamp, naivedyam and betel leaf to Devi.
Kunkumarchana : Kumkum actually means saffron. Those who are affluent can offer strands of saffron with each name using the thumb and ring finger . Otherwise pure Kumkum made from turmeric should be offered using thumb, middle finger and ring finger. Saffron prasada is edible. kumkuma prasada has to be applied by the family members daily or it is to be immersed in flowing water.
Flower Archana : Red Hibiscus, red oleander, blue aparajita, lotus/ lotus petals, cloves, bilva leaves, fragrant flowers. Cloves can be consumed as prasada.
Foodgrain Archana : Unbroken rice, Makhana, parched grain(laavaa), or grains pertaining to planet of the Day eg rice on Monday (moon) , red cowpeas on Tuesday (Mars) . Use unbroken grains( instead of dal take chana). All this can be eaten as edible prasada.
Fruit Archana : pieces of dry or fresh coconut, Amla, fresh grapes, raisins, almonds, whole dry fruits, cardamom pods etc. all these can be eaten as edible prasada.
#नवरात्र
#नवरात्रउपासना
#देवीचीसोपीउपासना
#दुर्गादेवीचीएकशेआठनावे
#दुर्गाअष्टोत्तरशतनामावली
#देवीचीएकशेआठनावे
#नवरात्रपूजा
#कुंकुमार्चन
#सोपीउपासना
21 сен 2024