Rahsya Cold Pressed Oil
माढा(जि.सोलापूर)येथील संदिप कापसे हे रहस्य लाकडी घाण्याचा तेलाचा व्यवसाय गेल्या तीन वर्षांपासून करत आहेत.
संदिप कापसे हे मेकॅनिकल इंजिनिअर असून मार्केटिंग विभागात त्यांनी नोकरीसुद्धा केली आहे. रहस्य या ब्रँडच्या उभारणी मध्ये नोकरीमधील अनुभवाचा खूप फायदा झाला असे ते सांगतात. शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे व्यवसाय निवडताना भविष्यात त्याचा शेतकऱ्यांना सुद्धा फायदा झाला पाहिजे आणि ग्राहकांचे सुद्धा समाधान झाले पाहिजे यातूनच त्यांनी बराच अभ्यास केल्यानंतर लाकडी घाणाच्या तेलाचा व्यवसाय निवडला.
सुरुवातीला त्यांनी दोन लाकडी घाण्याची खरेदी कोईमतूर येथून करून आपल्या प्रवासास सुरुवात केली. रहस्य मध्ये आज शेंगदाणा,सूर्यफूल,करडई,जवस,बदाम,मोहरी,तीळ,
एरंडी इत्यादींच्या तेलाचे उत्पादन घेतले जाते. लाकडी घाण्याचा तेलाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ते अनेक माध्यमांतून प्रयत्न करत असतात. आज लोकांना शुद्ध तेल मिळाले पाहिजे या ध्येयातून संदिप कापसे व संपूर्ण रहस्य टीम काम करत आहे. मार्केटिंग विभागात नोकरी केल्यामुळे रहस्य चे ब्रँडिंग करताना अनेक गोष्टींचा त्यांनी अवलंब केला. आज फक्त लोकल मार्केटवर अवलंबून न राहता संपूर्ण भारतात तेलाची डिलिव्हरी ते कुरियरच्या माध्यमातून घरपोहोच करतात.
ग्रामीण भागात अशा प्रकारच्या स्टार्टअप उभे राहिले तर येथील अर्थव्यवस्थेस चालना मिळण्यास मदत मिळते.
All Rahsya Products available on IFE Store-
Use a Coupan Code "RAHASYA5" for 5 % Discount
Rahasya Coconut Oil- ifestore.com/product/buy-raha...
Rahasya Sesame Oil- ifestore.com/product/buy-raha...
Rahasya Safflower Oil- ifestore.com/product/buy-raha...
Rahasya Flax seed Oil- ifestore.com/product/buy-raha...
Rahasya Groundnut Oil- ifestore.com/product/buy-raha...
Rahasya Mustard Oil- ifestore.com/product/buy-raha...
#coldpressedoil
15 окт 2022