Тёмный

द्राक्ष एप्रिल छाटणी नियोजन | draksh april chatni 

BharatAgri Marathi
Подписаться 183 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
👉हायड्रोजन सायनामाईड - krushidukan.bh...
👉यूनिवर्सल यूनिफेक्स सल्फर 90% उर्वरक - krushidukan.bh...
👉बोर्डो मिश्रण - krushidukan.bh...
===============================================================================
👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
✅आजचा विषय - 🌱द्राक्ष एप्रिल छाटणी नियोजन | draksh april chatni 👍
1️⃣खरड छाटनी घेणे -
1. ओलांड्यावरील सर्वच जुन्या काड्या एक डोळा राखून काढाव्यात.
2. ओलांडा खराब झाला असल्यास याच वेळी खराब झालेला भाग कापून घ्यावा व नवीन ओलांडा तयार करावा.
3. छाटलेल्या सर्व काड्या रोग ग्रस्त असल्यास एका ठिकाणी गोळा करून जाळून टाकाव्यात.
3. छाटनी नंतर ओलांडल्यावर राहिलेल्या डोळ्यावर १.५% हायड्रोजन सायनामाइड ३० मिली प्रति लिटर पाणी चे पेस्टींग करावे.
4. छाटणीच्या दुसऱ्या दिवशी बोर्डो मिश्रणाची १% फवारणी घ्यावी.
5. बागेत नत्राचा व पाण्याचा वापर सुरु करावा.
2️⃣उशिराच्या छाटणीमुळे- निर्माण होणाऱ्या समस्या -
1. द्राक्ष बागेस पुरेशी विश्रांती न मिळणे - द्राक्ष काढणीनंतर द्राक्ष बागेस विश्रांती मिळणे आवश्‍यक असते. द्राक्ष काढणीनंतर वार्षिक खतांच्या मात्रांपैकी उरलेली दहा टक्के खतांची मात्रा देऊन पाणी सुरू ठेवावे, त्यामुळे मुळांची वाढ होऊन त्याचा फायदा छाटणीनंतर निघणाऱ्या फुटींवर होतो. द्राक्ष बागेत विश्रांती देणे म्हणजे खते व पाणी देऊन वेलीस पुनरुज्जीवित करणे होय; मात्र अनेक द्राक्ष बागायतदार द्राक्ष काढणीनंतर बागेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात व अप्रत्यक्षपणे ताण देतात, हे पूर्णपणे अयोग्य आहे. विश्रांतीच्या काळामध्ये वेलीतील अन्नसाठ्यातील उत्पादनकाळात झालेला खर्च भरून काढला जातो. विश्रांती कमी मिळाल्याने फुटीच्या वाढीसाठी आवश्‍यक ऊर्जा मिळत नाही.
2. छाटणीपूर्वीच्या मशागतीच्या कामांना वेळ न मिळणे - खरड छाटणी हा द्राक्षवेलींच्या वार्षिक वाढीचा पाया समजला जातो. छाटणीपूर्वी योग्य मशागत करून साधारणपणे 15-20 टक्के मुळ्यांची नवनिर्मिती होणे आवश्‍यक असते. बागेस आवश्‍यक विश्रांतीचा कालावधी मिळालेला नसल्याने खोल मशागत केल्यास नवीन मुळ्यांच्या वाढीस वेळ लागतो, त्यामुळे उशिरा काढणी झाल्यानंतर मशागतीचे काम करताना जास्त प्रमाणात मुळ्या तुटणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
3. छाटणीपूर्वी खतांची असणारी कमतरता - खरड छाटणीपूर्वी मशागतीबरोबर बेसल डोस म्हणून शेणखत व सुपर फॉस्फेटची मात्रा दिली जाते, तसेच सुरवातीस नत्र व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला जातो. मात्र, छाटणीच्या घाईमध्ये ही मात्रा द्यायची राहून जाते. अशा परिस्थितीमध्ये विद्राव्य खतांचा वापर करणे योग्य ठरते, त्यासाठी छाटणीनंतर 1 ते 40 दिवस नत्र (युरिया दोन किलो प्रति एकर, प्रति दिवस) द्यावा, 41 ते 70 दिवसांच्या कालावधीमध्ये स्फुरद (फॉस्फरिक आम्ल दोन- तीन लिटर प्रति एकर, प्रति दिवस किंवा इतर स्फुरद खते) खतांचा वापर करावा.
3️⃣छाटणीनंतर फुटी निघण्याच्या समस्येवर उपाययोजना -
1. द्राक्षवेलीचा पूर्वीच्या हंगामातील उत्पादनाचा ताण असतानाच खरड छाटनी केली गेल्यास फूट निघण्यामध्ये अडचणी निर्माण होतात, तसेच या काळात वाढलेल्या तापमानामुळे वेलीअंतर्गत चयापचय क्रियांचा वेग मंदावतो. तसेच, या कालावधीत पाण्याची कमतरता असल्यास नवीन फुटी जळण्याचा धोका संभवतो. अशा परिस्थितीमध्ये खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.
2. एकसारख्या फुटी निघण्यासाठी 20 ते 30 मि.लि. हायड्रोजन सायनामाईड प्रति लिटर या प्रमाणात पेस्टिंग करावे. उन्ह कमी झाल्यानंतरच पेस्टिंग करावे, अन्यथा द्राक्ष डोळ्यास इजा होण्याची शक्‍यता असते.
3. उन्हापासून संरक्षणासाठी शेडनेट तसेच कापडाचा वापर द्राक्ष बागेत केलेला असल्यास ते काढण्याची घाई करू नये. शेडनेटमधील वेलींना एकसारख्या, तसेच सात ते आठ दिवस लवकर फुटी निघतात.
4. द्राक्ष बागेस पाण्याचा ताण पडू देऊ नये, मुळांच्या कार्यक्षेत्रात पूर्ण वाफसा ठेवावा.
5. क्षारांच्या सान्निध्यात पांढऱ्या मुळींची वाढ योग्य प्रकारे होऊ शकत नाही, त्यामुळे मुळ्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये साचलेले क्षार काढून टाकण्यासाठी गंधक पावडर 5 किलो प्रति एकर या प्रमाणात मातीमध्ये मिसळावी. काही दिवसांनी भरपूर पाणी देऊन निचऱ्यास मदत करावी. याचा फुटीसाठी चांगला फायदा होतो.
6. छाटणीनंतर सातव्या ते आठव्या दिवसापासून रोज दोन ते तीन वेळा पाण्याची फवारणी करावी, त्यामुळे ओलांड्यावर आर्द्रता निर्माण होऊन एकसारख्या फुटी निघण्यास मदत होईल.
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 21   
@सचिनपाटील-ज4प
@सचिनपाटील-ज4प 6 месяцев назад
एक नंबर माहीती दिली साहेब
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 6 месяцев назад
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@sufiyanpatel4385
@sufiyanpatel4385 Год назад
Panavar charane akarache whole paddle ahe Kay problem ahe .
@sufiyanpatel4385
@sufiyanpatel4385 7 месяцев назад
Potash kamtarta
@arungangurde8658
@arungangurde8658 6 месяцев назад
Chaf cutter bital
@sagarmalkar9988
@sagarmalkar9988 7 месяцев назад
Nice....
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 7 месяцев назад
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@amougsidhshendage2638
@amougsidhshendage2638 4 месяца назад
12जुन रोजी छाटणी घेत आहे तरी व्यवस्थित पुढील व्यवस्थापन सांगावे सर
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 4 месяца назад
यावरती नक्की नवीन व्हिडिओ बनवला जाईल, धन्यवाद सर !
@nitinpagar4612
@nitinpagar4612 6 месяцев назад
छान
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 6 месяцев назад
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर !
@rahuldhavale2794
@rahuldhavale2794 Год назад
खुप छान माहिती दिलीत सर एप्रिल छाटनी मध्ये फुटवा एक सारखा होण्यासाठी उपाय योजना काय कराव्यात
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे ,या साठी नवीन व्हिडिओ बनू धन्यवाद सर !
@maheshdeshmukh6484
@maheshdeshmukh6484 7 месяцев назад
Nice
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 7 месяцев назад
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
@arungangurde8658
@arungangurde8658 6 месяцев назад
Kadya jalu naye mulching karavi
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 6 месяцев назад
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण विचारला प्रश्न बरोबर आहे मल्चिंग केल्यास खूप फायदा होतो. धन्यवाद सर !
@rushikeshtambe2404
@rushikeshtambe2404 Год назад
Pavsali tomato varities vr ek video bnva sir
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
आपण विचारलेल्या प्रमाणे नक्की एक व्हिडिओ बनू ! धन्यवाद सर .
@dadasasate8103
@dadasasate8103 Год назад
bh km m.
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi Год назад
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?
Далее