Тёмный

नाशिकची ग्रामदेवता श्री कालिका माता मंदिर दर्शन 🚩  

Anuj Marathi
Подписаться 368
Просмотров 321
50% 1

नाशिक शहरात फार पुरातन काळापासून म्हणजे मराठ्यांच्या राज्यात शहराच्या दक्षिण टोकाला जंगलामध्ये, रस्ताने जातांना वटवृक्षाच्या दुतर्फा रांगा व हिरव्यागार वनराईत निसर्गाच्या सानिध्यांत, रमणीय अशा जागेत लहानसे विटांचे बांधलेले श्री कालिका देवीचे मंदिर होते. ते अत्यंत जागृत व नवसाला पावणारे म्हणुन प्रसिध्द होते. त्याचा अनुभव बर्‍याच सात्विक लोकांनी घेतलेला आहे. इ.स.१७०५ च्या सुमारास श्री कालिका मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमंत आहिल्याबाई होळकर यांनी केला
मंदिरातील गाभाऱ्यात उंच ओट्यावर महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या मूर्ती आहेत. पूर्वी या ठिकाणी फक्त कालिकेची शेंदूरचर्चित मूर्ती होती पण तिचे कवच काढून हल्लीची नयनमनोहर मूर्ती तयार करून घेण्यात आली आहे. येथे श्रीकालिका माता कुमारिकेच्या स्वरूपांत आहे. तिचे स्वरूप चंडिकेसारखे उग्र नसून एखाद्या लहान बाल‌िकेसारखे अतिशय लोभस आणि सात्विक आहे. देवीच्या मागे नऊ फण्यांचा शेषनाग दिसतो आहे. तिच्या पायाखाली तीन राक्षसांची मुंडकी आहेत. त्यावर कालिकादेवी उभी आहे. तिच्या उजव्या बाजूंच्या हातांत त्रिशूल व तलवार तर डाव्या बाजूंच्या हातांत डमरू व खडग आहे. तसेच कमंडलू सारखे भांडे देखील आहे.
पूर्वी कालिकेच्या मंदिराचा आतला भाग अतिशय लहान होता. बाहेरचा सभा मंडपही पत्र्याचा व लहान असल्यामुळे यात्रेच्यावेळी भाविकांना दर्शन घेताना अत्यंत अडचण होई. त्यामुळे मंदिराच्या विस्ताराची मागणी पुढे आली. जनतेचे सहकार्य व मदत घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांनी २० डिसेंबर १९७४ रोजी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन केले. त्यानंतर बरोबर सहा वर्षांनी १९८० साली हल्ली आग्रारोडवर दिमाखात उभे असलेले श्रीकालिका देवीचे कलाकुसरीने नटलेले विशाल मंदिर व सभामंडप तयार झाले. या मंदिराचा गाभारा अठरा बाय अठरा फुटांचा तर शिखर ३० फूट उंच आहे. गाभाऱ्यापुढचा सभामंडप ४० बाय ६० फूट एवढा मोठा आहे. आता तर मंदिराला दोन्ही बाजूंना भव्य प्रवेशदारे आणि संपूर्ण परिसराला फरशी लावण्यात आली आहे. नवरात्रात आणि वर्षभर मंदिर परिसरावर क्लोजसर्किट टीव्हीद्वारे नियंत्रण ठेवले जाते.
सुरुवातीला हे फक्त कालिका मातेचे मंदिर होते. कालांतराने तिवारी, मेहेर, वाजे या देवीभक्तांनी महालक्ष्मी व महासरस्वती यांच्या मूर्ती मंदिराला भेट दिल्या. त्यानंतर थेट जयपूरहून देवींच्या तिन्ही मूर्ती तयार करून, त्यांची यथासांग प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मनाला शांतता मिळवून देणारे मंदिर कसे सुंदर, प्रशस्त, निवांत व स्वच्छ असावे याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे नाशिकचे श्रीकालिका मंदिर. यात्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या लाखो भाविक भक्तांसाठी सर्व प्रकारचा बंदोबस्त ठेवण्यासाठी प्रशासनाच्या विविध विभागांसोबत ग्रामदैवत श्रीकालिका देवीमंदिर विश्वस्थ मंडळ तत्पर आहे.
सौजन्य: esakal.com
Copyrighted Music:
Song Title: Manthara Cheppundo - Flute cover by Rajesh Cherthala
Flute: Rajesh Cherthala
Original Video: • Manthara Cheppundo - F...
Artist's Website: rajeshcherthal...
Disclaimer: This video features a flute cover of the song "Manthara Cheppundo" by Rajesh Cherthala. The original video and music are copyrighted by Rajesh Cherthala. For more information about the artist and their work, please visit their official website.

Опубликовано:

 

11 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@abhaypawar2978
@abhaypawar2978 8 дней назад
🙏🙏
@Linux_enthusiast
@Linux_enthusiast 8 дней назад
कालिका माता की जय
@yogitamohite5381
@yogitamohite5381 4 месяца назад
👍👌
@shitalpatil9629
@shitalpatil9629 4 месяца назад
Jay matadi 🙏🙏
@Rahulpatil-gs7dx
@Rahulpatil-gs7dx 4 месяца назад
जय कालिका माता
@neelam5077
@neelam5077 4 месяца назад
जय माता की 🙏🙏
@yogitashinde1146
@yogitashinde1146 4 месяца назад
🙏
@Kumudini_Patil
@Kumudini_Patil 4 месяца назад
जय कालिका माता🙏🏻🙏🏻
@yogeshpatil3233
@yogeshpatil3233 4 месяца назад
जय कालिका माता 🚩
@gokulpatil8844
@gokulpatil8844 4 месяца назад
🙏🙏
@Linux_enthusiast
@Linux_enthusiast 4 месяца назад
कालिका माता की जय
@vaibhavamrutkar6816
@vaibhavamrutkar6816 4 месяца назад
कालिका माता की जय
Далее
super banana 🌱
1:01
Просмотров 1 тыс.