Тёмный

निसर्गाची किमया -साम्रद दरी |Sandhan Valley (Asia's Second largest Valley 

Travel With VB
Подписаться 6 тыс.
Просмотров 920
50% 1

साम्रध दरी
सह्याद्रीत भटक्यांसाठी अनेक थरारक ठिकाणे आहेत. सुरुवातीला ही ठिकाणे फक्त भटक्या लोकांनाच माहिती होती. परंतु नंतरच्या काळात भटक्यांचा ओघ वाढला, गावकऱ्यांनी सुध्दा त्या जागेचे महत्त्व ओळखले आणि खऱ्या अर्थाने इतके दिवस अज्ञात असलेली ठिकाणे सर्वसामान्य लोकांना माहिती पडली. असेच एक ठिकाण म्हणजे सांदन दरी. भंडारदरा धरणाच्या पश्चिमेला बाजूला सभोवतीच्या निसर्गशिल्पांच्या गराड्यात मधोमध साम्रद नावाचा आदिवासी पाडा वसला आहे. तिथून चालत चालत आपण रतनगडाच्या दिशेने येतो.
अवघ्या १०/१५ मिनिटात आपण एका भल्या मोठ्या घळीच्या मुखाशी पोहोचतो. तेच या प्रसिद्ध अशा सांदण दरीचे मुख आहे. विशेष म्हणजे ही दरी जमिनीच्या पातळीखाली आहे. या दरीत जाण्यासाठी थोडेसे खाली उतरावे लागते. वसुंधरेच्या गर्भातील एक नितळ आनंद देणारी वाट तुडवताना जणू सृष्टीच आपल्याशी काही गूज सांगू पाहतेय, असेच पावलागणिक वाटत राहते! अतिशय अरूंद अशी ही लांबच लांब, जमिनीला पडलेली भेग आहे.
एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच म्हणावा लागेल. ही आपल्या देशातील अशा प्रकारची सर्वात मोठी घळ आहे. अशी ही अद्भुत रूपे पाहिली की निसर्ग नावाच्या किमयागारापुढे आपण किती खुजे आहोत याची जाणीव त्याच्या केवळ दर्शनाने आपल्याला क्षणोक्षणी होत राहते.घळीच्या सुरुवातीलाचा गार पाण्याचा एक जिवंत झरा आहे. जो उन्हाळ्यातही कधी आटत नाही. एक सोपा कातळटप्पा उतरुन आपण दरीच्या नळीत प्रवेश करतो. दरीचे वाकडे तिकडे वळण एखाद्या सापासारखे लांबच लांब दिसते. दरीत प्रवेश केल्यावर तिचे ते रूप पाहून आपण चक्रावून जातो. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ती अतिशय अरुंद नाळ आहे. ही नळी दोन्ही बाजूला उभ्या तुटलेल्या काळ्याकभिन्न कातळकड्यांनी बंदिस्त झालेली. पहिला कातळ्टप्पा उतरताच एक लहानसा डोह आपला मार्ग अडवतो
साधारण १.५ फूट खोल आणि १२/१३ फूट लांब त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून कौशल्याने पार व्हावे लागते. मग तीव्र उतार सुरु होतो. नाळ अधिकाधिक अरूंद होते. कुठेही सपाट मार्ग उरत नाही. दरडी, लहानमोठे दगडगोटे यांचा अक्षरशः तिथे खच पडलेला दिसतो. मग आणखीन एक मोठा पाणसाठा मार्ग अडवतो. एका बाजूला ४.५ फूट खोल पाणी, तर दुसर्या बाजूला ३ फूट खोल पाणी. हेही पाणी कधी आटत नाही, कारण पाण्याच्या बाष्पीभवनाला सूर्यकिरण इकडे पोहोचूच देत नाहीत. अतिशय थंडगार त्या पाण्यातून १७/१८ फूट लांब चालण्याचा थरार केवळ प्रत्यक्ष अनुभवावा घ्यावा असाच आहे
========//=========//==========//==========//===
Follow me on Facebook.
Vinod bhavarthe :- / vinod.bhavarthe
Travel With VB :- / travelwithvb
-----------------------------------------------------------------------
Follow me on Instagram :-
/ vinod_bhava. .
__________________$$___________$$____________
Music Credit
www.bensound.com
And
Song: Vlad Gluschenko - Backpack (Vlog No Copyright Music)
Music promoted by Vlog No Copyright Music.
Video Link: • Video
=========$$========$$=======$$========$$=======

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 21   
@nitakamble9983
@nitakamble9983 5 лет назад
Khup chhan, apratim
@milindkhedekarmk
@milindkhedekarmk 5 лет назад
अतिशय सुंदर व विस्तारीत माहिती दिलीस आणि मस्तच ठिकाण दाखवलंस मित्रा. छान करतोयस भावा... लयभारी
@TravelWithVB
@TravelWithVB 5 лет назад
धन्यवाद भावा
@kapilgund4935
@kapilgund4935 5 лет назад
खूप छान माहिती आणि अप्रतिम सौंदर्य
@TravelWithVB
@TravelWithVB 5 лет назад
धन्यवाद भावा
@dineshthakur8920
@dineshthakur8920 4 года назад
अप्रतिम दादा खूप छान .....😘😘😘🤗🤗🤗🤗🙏🙏🙏🙏🙏
@TravelWithVB
@TravelWithVB 4 года назад
धन्यवाद
@sureshgawande5474
@sureshgawande5474 3 года назад
एक नंबर दादा जय शिवराय
@TravelWithVB
@TravelWithVB 3 года назад
जय शिवराय
@Pranit_1881
@Pranit_1881 5 лет назад
😍🥰niceस
@TravelWithVB
@TravelWithVB 5 лет назад
Thnkx
@rishithdk5936
@rishithdk5936 5 лет назад
Keep rock bro😍
@TravelWithVB
@TravelWithVB 5 лет назад
Thnx
@gokulmali3366
@gokulmali3366 4 года назад
सुंदर अप्रतीम निसर्गसौंदर्य न्याहाळत 1ते 2 दिवसात भतकंती करु शकता रंध्हा .अम्रेला फॉल धरण परिसर बाग अमृतेस्वर मंदिर ओव्हर फ्लो कळसुबाई शिखर असे अनेक स्तळ ना आपण भेटी देऊ शकतो
@gopisambareproductions8615
@gopisambareproductions8615 5 лет назад
खुप सुंदर पन ड्रोन ने वरून शूट करायला पाहिजे होते
@TravelWithVB
@TravelWithVB 5 лет назад
धन्यवाद ... द्रोण ने शूट. करण्यात वेगळी मजा आहे ..पण ड्रोन सध्यातरी आवाक्याबाहेरची गोष्ट आहे ....लवकरच तोही घेऊ
@pramoddongre5895
@pramoddongre5895 5 лет назад
can we trek down from the end point ? which is the nearest point of pick up after descending ,time and Km.
@TravelWithVB
@TravelWithVB 5 лет назад
No, there is no other way from end point .. you will have to come back to point where you started from ...
@gokulmali3366
@gokulmali3366 4 года назад
Newasa NAHI akole tal
@gokulmali3366
@gokulmali3366 4 года назад
मी स्व्तः ही 3 वेळेस गेलेलो आहे तो अनुभव वेगळाच असतो पावसाळ्यात 10 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत प्रचंड पर्यटकांची गर्दी असते
@TravelWithVB
@TravelWithVB 4 года назад
हो... पावसाळ्यात खूप पाऊस व्हायच्या आधी जायचं म्हणजे खाली दरीत सुद्धा जाता येत
Далее