आपण घेतलेली मुलाखत खूपच भावली सर्व अजिंक्य विचार पटले या काळात मधल्या आजी फारच सुंदर बोलतात असाच ग्रामीण भागातील आपण विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवले पाहिजे आपले धन्यवाद
जय श्रीराम जय श्रीकृष्ण रामकृष्ण हरी पांडुरंग हरी माऊली आज पण आजी आहो जाओ करतात सर आपण तर त्यांचे नातवा समान आहात धन्यवाद तरीपण आपणास एक ही शब्द आजी एकेरी बोलल्या नाहीत हिच खरी आपली संस्कृती धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
मधी बसलेल्या आजीचे विचार एकदम सुंदर आणि एकदम ब्रॅण्डेड आहेत सुना मजेत सांभाळत असतील कारण त्यांचे विचार आताच्या काळानुसार खूप छान आहेत मधली आजी एक नंबर आणि भारी
मला माझ्या आजीची आठवण आली. लहानपणी मला जवळ घेऊन गाणी, गोष्टी सांगायची. " हरिनामाची भक्ती, फुगडी खेळ ग शिवशक्ती"ही ओळ अजूनही आठवते.मधल्या आजीचे घर म्हणजे " गोकुळ " आहे. म्हणून आजीचा जीव घरात रंगला आहे. माझी आजी उस्मानाबाद जिल्ह्यातील. आज मी आजोबा आहे.