Тёмный

प्रभाकर जोग, अरूणा ढेरे, रवींद्र साठे, रघुनंदन पणशीकर यांच्या हस्ते विभोर'चे २६ ऑगस्ट रोजी प्रकाशन! 

Ram Kondilkar
Подписаться 2,4 тыс.
Просмотров 377
50% 1

प्रभाकर जोग, अरूणा ढेरे, रवींद्र साठे, रघुनंदन पणशीकर यांच्या हस्ते उज्ज्वला अन्नछत्रे, संगीतकार मिलिंद जोशी यांच्या विभोर'चे २६ ऑगस्टरोजी प्रकाशन!
’आयुष्य जगताना हरवलेले अनेक क्षण कवितेच्या रूपात मुठीत पकडण्याचा प्रत्येक कवीचा प्रयत्न असतो, त्यादृष्टीने पाहिल्यास कवयित्री उज्जला अन्नछत्रे यांच्या कवितांना प्रगल्भतेचा स्पर्श आहे. `विभोर' हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह असला तरी त्यामध्ये नवखेपणाच्या खुणा नाहीत,“ असे भावोद्गार प्रसिध्द कवयित्री अरूणा ढेरे यांनी या काव्यसंग्रह - संगीत अल्बम प्रकाशनाच्या वेळी काढले होते. पुण्यातील कवयित्री उज्ज्वला अन्नछत्रे यांच्या 'विभोर' काव्यसंग्रहाचे व म्युझिक अल्बमचे प्रकाशन अनुक्रमे जेष्ठ कवयित्री अरूणा ढेरे व जेष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांच्या हस्ते रामी ग्रँड या पंचतारांकित हॉटेलमध्ये अतिशय देखण्या सोहळ्यात संपन्न झाले होते. हा सोहळा २६ ऑगस्ट २०१२ मध्ये संपन्न झाला होता. त्यावेळी प्रसिद्ध लेखिका - कवयत्री डॉ. अरूणा ढेरे बोलत होत्या. व्यासपिठावर प्रा. नीलिमा गुंडी, संगीतकार मिलिंद जोशी, जेष्ठ गायक रवींद्र साठे, रघुनंदन पणशीकर, `फाऊंटन म्युझिक'चे कांतीलाल ओसवाल, कवयत्री उज्ज्वला अन्नछत्रे, अरूण अन्नछत्रे, गायिका चैतन्या अन्नछत्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
"आयुष्य जगताना येणाऱ्या विविध अनुभवातूनच कविता जन्माला येते" असे सांगताना कवयित्री अरूणा ढेरे पुढे म्हणाल्या की, "सर्वसामान्यांना जे अनुभव येतात तेच अनुभव कवीच्याही वाटयाला आलेले असतात, परंतु कवीचे संवेदनशील मन अशा अनुभवांमुळे अस्वस्थ होते व त्यातूनच चांगली कविता येते. कवयित्री उज्ज्वला अन्नछत्रे यांच्या कवितेत संवेदनशीलतेबरोबरच सखोलता व प्रगल्भता आहे, त्यामुळे त्यांची प्रत्येक कविता वेगळ्या जातकुळीची वाटते, शिवाय त्यांच्या प्रत्येक कवितेला वेगळा चेहरा आहे, कवयित्री म्हणून त्यांची पुढची वाटचाल खूपच आश्वासक आहे," असे त्यांनी शेवटी सांगीतले. तर प्रा. नीलिमा गंडी यांनी उज्ज्वला अन्नछत्रे यांच्या कविता वैविध्यपूर्ण असून त्यामुळे त्या रसिकांशी मैत्री करणाऱ्या आहेत असे सांगितले. `विभोर' काव्यसंग्रहाचे व म्युझिक अल्बमचे प्रकाशन एकाचवेळी झाल्याने अक्षर, नाद आणि रेखांच्या अनोख्या एकत्रीकरणाचे दर्शन झाले असेही त्या म्हणाल्या.
जेष्ठ संगीतकार प्रभाकर जोग या म्युझिक अल्बमचे प्रकाशन करताना म्हणाले की, "कवयित्री उज्ज्वला अन्नछत्रे यांच्या कवितांना संगीतकार मिलिंद जोशी यांनी दिलेल्या चाली अतिशय वैविध्यपूर्ण असून ही गाणी वेगवेगळ्या वयाच्या रसिकांना नक्कीच आवडतील अशी आशा आहे". संगीतकार मिलिंद जोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की उज्ज्वला अन्नछत्रे यांच्या कवितेमध्ये विविधतेबरोबरच गेयता असल्यामुळे ज्येष्ठ गायक रवींद्र साठे, रघुनंदन पणशीकर या दिग्गज गायकांसह चैतन्या अन्नछत्रे सारख्या तरूण व ताज्या दमाच्या गायिकेकडून गाणी गाऊन घेणे सोपे झाले.
'विभोर'च्या कवयित्री उज्ज्वला अन्नछत्रे यांनी आपल्या काव्यजीवनाच्या प्रवासाचा आढावा घेतला. लहानपणी आजीने सांगितल्यामुळे डायरी लिहून ठेवण्याची सवय पुढे कविता लिहायला खूप मदतीला आली असे सांगताना त्या म्हणाल्या जगाच्या पाठीवर असलेल्या असंख्य देशात माझी भटकंती झाली व तेथे आलेले काही अनुभव मी कवितेच्या रूपात शब्दबध्द केले. याप्रसंगी जेष्ठ गायक रवींद्र साठे, रघुनंदन पणशीकर, मिलिंद जोशी तसेच उज्ज्वला अन्नछत्रे व चैतन्या अन्नछत्रे यांनी विभोर या म्युझिक अल्बम मधील काही निवडक गाणी गाऊन उपस्थित रसिकांचे छान मनोरंजन केले. प्रारंभी अरूण अन्नछत्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंजिरी जोशी यांनी केले.
प्रसिध्दी प्रमुख : राम कोंडीलकर

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Вопрос Ребром - Булкин
59:32
Просмотров 998 тыс.