शालेय अभ्यासक्रमात stroke/paralysis व हार्ट अटॅक वर माहिती समाविष्ट करावी यासाठी काही करता येत असेल तर करा. Stroke ची लक्षणे सुरू झाल्यावर पहिल्या 4 तासात ऍडमिट केले तर रुग्ण पूर्णपणे ठीक होतो. अनेकांना हे माहीत नाही त्यामुळे वेळ केल्यामुळे अनेक जण अपंग होतात. सकाळी निदर्शनास आलेला paralysis हा रात्रीच सुरू झालेला असतो त्यामुळे अशा रुग्णाला तत्काळ पहिला 4 तासाचा पिरियड निघून जाऊ नये म्हणून जवळच्या दवाखान्यात न्यायला पाहिजे. Cardiac arrest मधे cpr दिल्यावर अनेकांचा जीव वाचू शकतो पण cpr कधी व कसा द्यायचा हे 5% तरी लोकांना माहीत आहे का? अशी माहिती अभ्यासक्रमात द्यायची सोडून बिनकामाची रद्दी शिकवली जाते.