बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास | Banker to Farmer वसईत अजूनही खूप मोठ्या प्रमाणात बागायती शेती केली जाते व आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करणारे बरेच शेतकरी आहेत. श्री. ज्यो मच्याडो ह्यांचा उमेदीच्या काळातील बँकिंग क्षेत्रात घोडदौड करणारे बँकर ते वसई-विरार गौरव पुरस्काराने सन्मानित प्रगतशील शेतकरी हा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. शिवाय खालील गोष्टींबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा... - विक्रमी साडेसहा फूट उंचीच्या मिरचीच्या रोपांपासून केवळ चार महिन्यात एक लाख सत्तर हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न कसे मिळवले? - वसईत हापूस आंब्याचे पीक कसे घ्यावे? - गांडूळ खताची मोठ्या प्रमाणात निर्मिती - परदेशी ब्रोकोली, झुकेणिचे पीक कसं घ्यावं? - अडीच टन तांदूळ कसा पिकवला? इतर कोणती पिके घेतली जातात, किती दिवसांत पीक हाताशी येते, आणि बरंच काही... हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! विशेष आभार: ज्यो मच्याडो अंकल व रिटा आंटी (९९२२९३३६०९) छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ वसईतील भाजी शेती ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-bmP8We3_hII.html वसईचा केळीवाला ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-mwV8UATbBjg.html वसईतील पानवेल/विड्याची पानं ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-cr_uRWPxmVI.html २०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jgI_O6lOCvk.html एक दिवस पर्यावरणाचा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Hly80zfJfYk.html वसईच्या ऑर्किडची कहाणी ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Tp9xrocunXY.html हरित वसईतील केळबागा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-nWk15qzfNoQ.html वसईतील रताळ्यांची लागवड ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-_oHx0AVhNlY.html वसईतील पारंपरिक फळ-फुल बाग ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-zb4N7ERgmLQ.html हरित वसईतील एक संध्याकाळ ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-iHLV3HzMBQg.html #vasaifarming #indianfarmer #sunildmello #vegetablefarming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture #bankertofarmer
सुनील दादा, तुमचे विडिओ अतिशय सुंदर असतात, विशेषतः तुम्ही ज्या विषयाचा विडिओ बनवता त्याची माहिती आणि चित्रीकरण सुद्धा अतिशय सुंदर असते, विशेषतः तुम्ही खूप खूप सुंदर मराठी बोलता, त्याचे खूपच कौतुक वाटते
नमस्कार 🙏 सुनील जी आपण वसईची एक सकारात्मक आणि प्रेरणादायी ओळख करून देत आहात या साठी धन्यवाद! वसईची विविध व्यावसायिक शेती, सामाजिक बांधिलकी, मातीत रुजलेली विभिन्न पण मानवतावादी भावनेने एकत्र गुंफलेली संस्कृती यांचे दर्शन तुम्ही घडवता. असेच चांगले कार्य आपल्या हातून घडत राहो.
🌹जय जवान जय किसान 🌹अंकल व आंटी ना मानाचा मुजरा 🌹कोण म्हणेल शेतकरी म्हातारा होतो ,शेती व शेतकर्याला म्हातारपण येते नाही., फक्त हवे ठाम निश्चय,जिद्द, विश्वास आणि सुंदर विचारसारणी .....धन्यवाद.
ज्यो मचाडो काका व सुनिल भाऊ यांचे शुद्ध मराठी संभाषण ऐकून खुप अभिमान वाटला. शेतीविषयी बांधिलकी, स्वत:ची संस्कृती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न यातून दिसतो. शुभेच्छा आपल्या चॅनलला.
@@sunildmello वसई विषयी सर्व गोष्टी ज्ञात आहेत. वसईची खाद्य संस्कृती, हरित वसई, मराठी ख्रिस्ती समाजाने जोपासलेली संस्कृती, मराठी साहित्य क्षेत्रातील फादर फ्रांसिस दिब्रिटो यांचे योगदान या सर्व गोष्टी वसईच्या शिरपेचात शोभा आणतात.
धर्मावर ,जातीवर भाषा अवलंबून नसते. भाषा त्या प्रदेशावर अवलंबून असते म्हणूनच महाराष्ट्रात सर्व धर्मांचे, जातीचे लोक मराठी बोलतात व ते मराठी च आहेत. यांची मराठी इतर मराठी लोकांसारखीच चांगली आहे. फादर दिब्रिटो यांचं मराठी साहित्य तर लोकप्रिय आहेच. माझा एक या भागातील मित्र श्री. मार्शल कोरिया ज्ञानेश्वरी वर उत्तम बोलायचा. महाराष्ट्रातील राजपूत, मराठवाड्यातील रेड्डी, वेलमा अशा जातींना पण मराठी बांधव जाती मुळे अमराठी समजतात पण हे लोक मराठी भागात शेकडो वर्षांपासून राहतात, यांची मातृभाषा मराठी च आहे पण या जाती इतर राज्यात मोठ्या संख्येने आहेत म्हणून या जातीच्या मराठी लोकांना पण परप्रांतीय समजतात. सध्याच्या महाराष्ट्रात पुर्वी अनेक राज्य होती उदा. छत्रपती शिवाजीराजे यांच राज्य, आदिलशाही, जळगाव भागात मोगलाई , पोर्तुगीज राज्य. शिवरायांच्या राज्यात कानडी, तामिळ भाषिक भाग पण होते.तसेच आदिलशाही, मोगलाई, पोर्तुगीज राज्य मध्ये मराठी भाषिक व ईतर भाषिक भाग पण होते. आणि या राज्यात अनेक धर्मिय, जाती गुण्यागोविंदाने राहत होते. इतिहास जागरूक पणे समजून घेतल्या वर गैरसमज होत नाहीत. जोसेफ अंकल व रीटा आंटी यांच्या कौतुकास्पद कामाला शुभेच्छा . सुनील ,तुमचे विडिओ, मुलाखती उत्तमच आहेत. शुभेच्छा
Wow very superb video. I like to watch your video. खुप छान माहिती. पडवळ ची भाजी खुप छान लागते तुमची बायको वीडीओ खुप छान काढते तीची सुधा खुप मेहनत आहे. Always be together. Gooduck both of you
खूपच छान...प्रेरणादायी काम...पाहताना तर आल्हाददायकही वाटले...अस उत्तम काम करणारे पाहिले की जग सुंदर वाटू लागत..तुमचंही खूप औतुक व आभार की तुम्ही असे लोक शोधून त्यांवर video करता...खूप शुभेच्छा तुम्हाला व ह्या सर्व गुणी माणसांना🙏
सलाम तुमच्या कार्याला. शालेय जीवनात आम्ही ही शेती करत तेव्हापडवळाचा भारा बांधण्यासाठी लागणारा वाक केळीच्या लोदा पासून,फरलाचेे बनवत,वेढणी,काढणी ,वात तोडणे सर्व कामे आम्ही लहान भावंडेच करत असू.तुमची बहरलेली शेती पाहून खुप आनंद झाला
सुनिल सर आणि जोसेफ अंकल यास अभिवादन....!!🙏🙏🙏 👍 बँकर ते शेतकरी हा श्री जोसेफ अंकल यांचा सदर क्षेत्रातील यशस्वी प्रवास वसईतील शेतकरी वर्गासाठी प्रेरणादायी असाच. 👍 जोसेफ अंकल आणि सुनील सर यांचे सदर चित्रफिती मधील संवादात्मक भाष्य माहितीपूर्ण आणि संग्रही ठेवण्यासारखे असेच 👍सदर चित्रफिती मधील आशय अतिशय छान, अर्थ पूर्ण असाच. 👍पडवळ, गल्के, कोथमिर, या सर्व फळ भाज्या अप्रतिम, जीवनसत्व युक्त अश्याच 👍हापूस आंबा ५०-६० कलमे बहारदार 👍गांडूळखत आणि भात शेती याबद्दल माहिती रोचक रंजक अशीच. 👍सादरीकरण सर्वोत्तम अफलातून असेच 👍कालावधी सर्वोत्तम आणि इतकाच कालावधी आणि सदर बाबत माहितीपट आणि लघुपट येऊ देत. 👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास इंग्लंड संघाचा कर्णधार आणि शैलीदार फलंदाज डेव्हिड गॉवर याची खेळी सातत्याने तथा नेहमीच इंग्लंड संघाला विजयश्री द्यावयाची. सदर फलंदाजांचे शतक कधी व्हायचे ते प्रतिस्पर्ध्याला अवगत व्हायचे नाही आणि तदपूर्वीच इंग्लंड संघ सामना आणि मालिका खिशात घालायचा. तसे इथे सुनील सर कधी कोणती चित्रफीत, माहितीपट , लघुपट सादर करतील हे कुणालाही सांगता येणार नाही . 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
असा शेतकरी वसईत होणे नाही...प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व आहे...यांची मुलगी राज्य सेवा अधिकारी म्हणून कार्यरत होती...सध्या वास्तव्य विदेशात आहे...त्यांच्या शेतीप्रती असलेल्या कार्याला आमचा सलाम... व आपण हा व्हिडीओ बनवून युवकांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचे आवाहन करता त्याबद्दल आपले मनापासून आभार..
सुनिल, फारच सुंदर विडिओ. सॅल्युट टू जोसेफ सर, सर जे काही करत आहेत, त्याचा फायदा हा तरुण पिढीला नक्कीच होईल, अधिकारी म्हणुन रिटायर झाल्यावर शेतीत रमलेले प्रगतिशील शेतकरी म्हणुन गौरविण्यात आलेले सर फारच कमाल. आणि लोक म्हणतात की fluent English बोलली जाते परंतु सुनिल, आपण तर fluent मराठीत काय छान बोलता. जोसेफ सर आणि फॅमिलीला सॅल्युट. धन्यवाद
सुनिलजी, तुम्ही एक चांगले पत्रकार सुद्धा होऊ शकता. व तुमच्या सारख्या सकारात्मक स्वभावाच्या ,छान मराठी बोलणाऱ्या व समोरच्याला बोलतं करणाऱ्या माणसाची या क्षेत्राला गरज आहे असं मला वाटतं. .पण एकच माणूस काय काय करणार ! ....असो, खूप शुभेच्छा.
हि व्हिडीओ खूप छान आहे. जोसेफ अंकलची शेती बघून डोळे दिपून गेले. आणि त्यांची मेहनतीला दाद द्यावी तितकी थोडी आहे आहे. सुनील, तुलाही सलाम! खूप सारी माहिती आम्हाला घरी राहून मिळते🙏
I love the way you are taking to the tour of socio economic, cultural and the people of vasai. Can't believe it is happening so near Mumbai. So much down to earth. Request if you can arrange for his contact or arrangements for his visit. Personally all our agriculture land was lost to different government agencies it's nostalgic yet pain to realise once upon a time we were farmers and now we are no more farmers
@@sunildmello thanks a lot for your prompt reply. Particularly you have shared his mobile. It will be a gr8 pleasure for me to interact which such personality
खूप छान व्हिडिओ,खूप छान माहिती. जो साहेब आणि रिटा आंटी चे अभिनंदन. सेंद्रिय शेती चे महत्व काय आणि किती आणि त्याचे फायदे किती हे त्यांनी छान सांगितले आहे. मी सुद्धा गेले तीन चार वर्ष वर्षभर पुरेल इतकी सेंद्रिय हळद एक छंद म्हणून करतो. तुम्हाला आणि जो साहेब आणि रिटा मॅडम ना खूप खूप धन्यवाद 👌👍🙏
HATS OFF to UNCLE & AUNTY , really !!!! And offcourse , I am for the first time on your channel & I observed that you anchored the show very well in every manner..... THANKS VERY MUCH !!!!
Recently I have subscribe your channel I watch your channel in free time in lockdown I lost my job I started my vegetables business but I was not knowing where to buy these vegetables so one day I was searching I saw your channel i saw your video where farmer was harvesting methi mulla and they sell in virar chandansar so I went there and I daily go there to buy vegetables I sell in mira road Thanks to your video I really get in cheap rate and get profit Thanks to your video
Those people who upload videos of film celebrities should learn from the uncle...aunty and the anchor how to be guide to happy life. All of them speak excellent marathi. Hats off to all of three.
Retirement नंतर माणसं आराम करतात पण काका काकूंच्या support ने शेती व्यवसायात परत उतरले आहात ते पण एज्युकेशन ghevun मानलं पाहिजे तुम्हाला काका.तुम्हाला मानाचा मुजरा. तरूण पिढीला लाजवेल असे काम करत आहात तुम्ही👏👏👏👏तरूण पिढी साठी तुम्ही आदर्श आहात🙏
Sunil this is one of the superior video you have uploaded. Uncle and Aunty salute to your great work in agriculture. Really you are doing great inspirational job. You have shown after retirement what wonders can be possible. Lot of farmers and other service category people also can take inspiration from you.
Sunillji tumhi josephjincha hirvyagar shetichi safar on line ghàdavlit tyabaddal dhanyavad. Josefji hats of you retirmentnanrar nusta aram n karta chan upkram rabavlat kautuk ahe sunilji khup chan vidio kelàt dabyavad
निवृत्तीनंतरच्या आपल्या या सुंदर उपक्रमास जोसेफ उभयतांना माझा सलाम.हल्ली सुनीलच्या पारंपारिक विविधपूर्ण पाककृत्या त्यांच्या पध्दतींची माहिती फारच कौशल्याने छान मराठीतून समजावुन सांगताना आवड निर्माण झाली आहे तरी अश्या माहितीद्वारे आम्हास त्या संस्कृतीची ओळख करून देत रहा.आपल्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता लाखलाख हार्दिकशुभेच्छा.
खूपच प्रेरणादायी व माहितीपूर्ण चित्रीकरण तसेच सादरीकरण होते. जो काकानी गांडूळ खताची दिलेली माहिती खूप छान दिली.अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने त्यांनी समजावले.सुनील जी तुम्हांला सलाम असे हे अवलिया शोधता आणि आम्हांला ही त्यांचे दर्शन देता.
Sunil bhau, hats off to your passion.. They way your asked questions.. Very good information. या अंकल आंटी नि जे शेती मध्ये काम केले आहे, ते नक्कीच प्रेरणादायी आहे. गांडूळ खत प्रकल्प खूप आवडला..
Thanks Machado uncle you are really progressive farmer and really mile stone for palghar dist farmer Thanks suna You are really explorer of farmers Life Waver hai to power hai🙏
Very well made video & presented. It will inspire the younger generation of Vasai Virar belt to cultivate every inch of vacant land by forming SHG's. The elected MLA & MP of the area should help in getting Government schemes with subsidy to this area farmers. I hope all will avoid Chemical fertilisers & pesticides & grow toxin free food for self & market.
Very nice ,very usefull information and inspiring interview. People always think to rest at time of retirement Joseph uncle is working .. Good inspiration to retired people too. Suni ji your questions were on good points.
Wow khup chan ahey Video Sunil, bharpur mahiti milali Sheti badal ani hey Kaka Yevdhya mothya Job varna retire hovun City madhli Poosh life na Jagta chan Pragatshil Shetkari mahnun jagne Pasand kartat, kharach khup abhiman Vatto aslya Avliyancha ani Tumhi tar Great ahatach karan amhala ghar baslya Yevdhi chan chan mahiti purvat asta ani Ti hi Pratek Veli Vegli
What an amazing way to spend the retirement. Kudos to Joe Uncle and Rita Aunty. They should start "farm to table project" in Mumbai. Instead of selling it to the vendors, they can home deliver to the consumer. This way the consumer not only can get the freshest farm produce but also knows where and how it is grown. This concept is the most hottest food concept in the western countries as eating organic and locally grown gives the best nutrition. Thank you for bringing such as amazing information and god bless!!
Thanks Sunil, for making such informative video, and hats off to the determination of Joseph uncle and serving society , lastly Sunil have very good command on Marathi, enjoy hearing marathi. 🙏
hey ...so good to see joe machado sir....i know him since ...when he was an manager at bccb bank...papdy branch.....a very very humble human being...and was always in my mind and heart because of his humbleness and kindness......god bless u machado saheb....feeling so so good to see u on screen .....kudos to sunil for such an great and inovative video.....all the best always
सुनीलजी हा विडिओ बघून खूप समाधान वाटले... काही क्षण मला आमच्या कोकणातील आंबा, काजूच्या बागेत असल्या सारखे वाटले.... जो काकांना नमस्कार सांगा.. ग्रेट माणूस! तुमची बोलण्याची पद्धत,भाषा व शब्द हे सर्व आमच्या कोकणातील आहेत... i. e. उडवे वगैरे.... बैलगाडीची चाके उडव्याला लागून होती पण बैलगाडी दिसली नाही..! खरंच खूप छान.... खूप खूप धन्यवाद.... आणि हो तुमच्याकडून एक व्हिडिओ अपलोड करायचा बाकी आहे ! 👍 चित्रीकरण छानच.......
very inspiring. From childhood when ever we got holidays in our villages we have helped our uncles/ aunties grand parents as we were having our subjects on such topics. This was like reviral . TKS to Sunil, Joe n Rita