Тёмный

बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी | Baare Panduranga | Bhairavi Jadhav | Subash lad | Sunil Jadhav| 

Majhi Maybhumi
Подписаться 1,7 тыс.
Просмотров 4,7 тыс.
50% 1

गायीका : भैरवी जाधव
गीतकार : सुभाष लाड
संगीतकार : सुनील ( बुवा) जाधव
संगीत संयोजन : अशोक वायंगणकर
सदा मुळीक
कोरस : श्रुतिका जाधव , श्रद्धा जाधव , तेजश्री मालोणकर
ध्वनिमुद्रण - कमलेश शर्मा
स्टुडिओ लाईन इन (खार मुंबई)
Lyrics
बा रे पांडुरंगा केव्हा भेट देसी
काही तुजपाशी बोलायाचे !!ध्रू !!
घालोनिया गळा तुळशीच्या माळा
नामसंकिर्तन करीती सोहळा
परि ना उमाळा परदु:खे !!१!!
थोर साधूसंते ठेविले लिहून
करा भूतदया होई निरूपण
फक्त पारायण वाचनाचे !!२!!
भेदाभेद मुळे रूतलेली खोल
मी तू पणा द्वेष ढलताेय तोल
नाही का अमोल माणुसकी !!३!!
आळसाचे मित्र नामाच्या बहाणे
विज्ञान सोडोनी शोधिती पुराणे
जिणे दिनवाणे दोष कोणा !!४!!
मारिती जे झाडू आणीतात स्वर्ग
वाढविती वृक्ष हासतो निसर्ग
कष्टकरी वर्ग तुझे रूप !!५!!
सुभाष लाड

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 57   
@pandurangtikam3844
@pandurangtikam3844 2 года назад
रजनीसुत ,गुरुवर्य सुनील बुवा जाधव अप्रतिम संगीत . आज सन्माननीय संगीत रत्न विलास बुवा पाटील यांच्या परिवारातील एक व्यक्ती जी त्यांचे नवनवीन संगीत चलींचा वारसा पुढे नेत आहेत, व आपला संपूर्ण परिवार संगीत क्षेत्रात पारंगत होत आहे,भैरवी चा आवाज खूपच सुरेल लागला आहे.तसेच नेहमीप्रमाणे सदाभाऊ मुळीक व अशोक दादा वायंगणकर यांचे संगीत नियोजन उत्तम,लाड सरांचे गीत फारच मार्मिक आहे, समाजाने त्याचा बोध घ्यावा, सोहमचे संकलन अप्रतिम एकूणच पूर्ण संच उत्तम जुळला आहे व गाणे परिपूर्ण झाले आहे, मी पांडुरंग टिकम बुवा ,त्यांचा डोंबिवलीतील शिष्य माझे वडील कै.दत्ताराम टिकम( मास्तर) बुवांना नेहमी तबल्यावर साथ करायचे, मी सदिच्छा देतो की सुनील बुवांनी,त्यांच्या टीम कडून नवनवीन गाणी करावी व त्यांचा संगीताचा वारसा असाच पुढं चालत राहो.
@dnyneshwarchavan4216
@dnyneshwarchavan4216 2 года назад
भैरवी तुझा अवाज फार सुंदर आहे. 👍👌
@sharadkhandare6606
@sharadkhandare6606 2 месяца назад
सन्माननीय लाड साहेब अप्रतिम मनाला स्पर्श झाला 🙏🙏
@snehalpawar5886
@snehalpawar5886 2 месяца назад
राम कृष्ण हरी खूप छान
@neetasawant1584
@neetasawant1584 2 года назад
खूपच छान आवाज आणि गीतलेखन 🙏🙏
@seedefect2609
@seedefect2609 2 месяца назад
अतिशय सुंदर गीत आहे. लाड सर, मी पुन्हा पुन्हा ऐकले. ऐकत रहावेसे वाटते
@swatilotankar4261
@swatilotankar4261 2 месяца назад
अप्रतिम गीत रचना आणि आवाजही खुप छान आहे.
@rajendrabijam8413
@rajendrabijam8413 Год назад
वा खुप सुंदर भैरवी
@someskarsandesh
@someskarsandesh 2 месяца назад
खूप छान गीतरचना लाड सर. अप्रतिम गायन 🙏
@RameshK-bu2fk
@RameshK-bu2fk 2 года назад
अप्रतिम शब्द रचना उत्तम
@ankush_organofarm
@ankush_organofarm 2 месяца назад
खूप छान भैरवी आणि धन्यवाद सुभाष सर आपले ही
@shankarrandive446
@shankarrandive446 2 месяца назад
अप्रतिम
@surendraparab8838
@surendraparab8838 2 года назад
फार छान
@dattatraydesai6196
@dattatraydesai6196 2 года назад
राम कृष्ण हरी
@ashokkamble752
@ashokkamble752 2 месяца назад
खूप छान
@sharmilakadam4964
@sharmilakadam4964 Год назад
खूप सुंदर फारच छान
@vitthalraokusale9170
@vitthalraokusale9170 2 года назад
परमेश्वर चराचरात , अवतीभवती आहे हा विचार आदरणीय सुभाष लाड सरांनी मोजक्या शब्दांत गीतरचनेतून सांगितला आहे. नेहमीप्रमाणे गायिका भैरवीने गोड गळ्याच्या नाद- लयीने विठ्ठल भक्तीचा मळा समृद्ध केला असून संपूर्ण टीमने प्रयत्नांच्या जोरावर गीतातून जणू प्रत्यक्ष पांडुरंग उभा केला आहे असे म्हणावसे वाटते!...... जय जय राम कृष्ण हरी! 🙏🙏
@ganpatshirke2638
@ganpatshirke2638 2 года назад
अप्रतिम रचना. भावार्थ मनाला भावला.श्री लाडसर आपले व संपूर्ण टीम चे अभिनंदन🌹🌹
@sharmilakadam4964
@sharmilakadam4964 Год назад
आवाज फारच गोड आहे
@shreedadarwala7650
@shreedadarwala7650 2 года назад
*_विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल!_* *अतिशय सुरेख अप्रतिम गीत झाले आहे! महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात जिथे जिथे मराठी माणूस पोहोंचलाय तिथे तिथे हे गाणं पोहोंचावं, वाजावं अन गाजावं अशी शुभकामना करतो!! कौतुक कुठून सुरू करावं अन कशाकशाचं करावं हेच कळेना! गाण्याचे शब्द चांगले, गायिकेने तर कम्मालच गायले आहे. फार गोड गळा लाभला आहे ह्या गायिकेला. कोरस तोही हार्मनीत अन किती सुस्वर झाला आहे अन ह्यात संगीत संयोजक अशोक दादा वायंगणकर ह्यांनी खरोखर त्यांची प्रतिभा सिद्ध केलीये. वाद्यमेळ सुरेल, वीडियोग्राफीही अतिशय मनमोहक झालीये!! सार्‍या टीमला माझ्या हार्दिक शुभेच्छा!* -श्रीनिवास (गायक) मुंबई.
@sudhirayare3299
@sudhirayare3299 2 года назад
सुभाष लाड भाई सुंदर रचना तितकेच अप्रतिम संगीत व गायन.
@pournimasutar6362
@pournimasutar6362 2 года назад
खूप छान भैरवी, गोड् आवाज आहे, 👌👌 तुझे आणि sarvanche खूप खूप कौतुक आणि abhinandana
@pakhwajmandar7452
@pakhwajmandar7452 2 года назад
लाड सरांची अप्रतिम रचना ,सुनील बुवा जाधव यांच उत्तम संगीत, भैरवीचे अप्रतिम गायन ,उत्तम कोरस
@vijayarvindhatkar1136
@vijayarvindhatkar1136 2 года назад
विठ्ठल।विठ्ठल। विठुरायाशी काही बोलायचे आहे ,किती सुंदर कल्पना.. वास्तव दांभिकतेवर प्रहार करणारे लाड सरांचे अप्रतिम गीत, भैरवीचा सुरेल सुंदर आवाज ,सोहमचे अचुक संकलन अर्थात एडिटिंग आणि सुनिलबुवांचे चपखल संगीत। सर्व मायभूमी ,स्वर भैरवी टीमचे अभिनंदन..
@amolrangayatrilanja7736
@amolrangayatrilanja7736 2 месяца назад
अतिशय सुंदर
@priyamandavkar1458
@priyamandavkar1458 2 года назад
भेदाभेद मुळे रुतलेली खोल...दाहक वास्तव.. आदरणीय लाड सरांची अप्रतिम रचना, त्याला साजेसे सुनील बुवांचे संगीत, सोहमचे जबरदस्त एडिटींग आणि भैरवीचा नेहमीप्रमाणेच सुंदर आवाज... खूप छान 👌👌👌
@pushpakolhe9090
@pushpakolhe9090 2 года назад
सुमधुर, प्रासादिक , श्रवणीय रचना
@shwetajadhav7014
@shwetajadhav7014 2 года назад
कोरोनामुळे पांढुरंगाची वारी झाली नव्हती पण आता मात्र या गाण्याने प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन घेतले अस वाटू लागलं आहे 😍🚩⛳. 🙏🙏.....भैरवी दीदी च्या आवाजाने कान मंत्र मुग्ध झाले ....अप्रतिम संगीत दिले.... लाड सरांनी लिहिलेलाअभंग खुप छान 🙏🙏🙏🙏🙌 🚩🚩🚩 ===*राम कृष्ण हरी*==🚩🚩🚩
@kishorayare7232
@kishorayare7232 2 года назад
लाड सर, तुमच्या नव्या कोऱ्या अभंग रचनेबद्दल तुमचं आणि तुमच्या team चं हार्दिक अभिनंदन! तुमच्या नवीन project ला नेहमीप्रमाणेच एका नवसर्जनाची जोड आहे. तुमच्या रचनेतील आशय व भावार्थ हा प्रबोधनात्मक असूनही आपला ताजेपणा टिकवून आहे.विठ्ठलभेटीसाठी आसूसलेल्या वारकऱ्यास विठ्ठलाशी हितगुज साधून, लडीवाळपने काही तक्रारी मांडायच्यात. मात्र त्या स्वतःच्या दुःख निवारणाच्या नसून विश्वात्मक कल्याणाच्या आहेत.हे विशेष! वारकऱ्याच्या मनाची व्याकुळता भैरवीताईंच्या वत्सल स्वरातून जिंदादीलीन पाझरते.........तिच्या स्वरात अचूक अनुभूती देण्याची विलक्षण क्षमता आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालूनच आपल्याला आपली देव हि संकल्पना जोपासावी लागेल तर आणि तरच अंधश्रद्धेच समूळ उच्चाटन आपण करू शकू हा आपला अक्षय विचार भावला.आपल्या रचनेचे विविध पदर हे प्रबोधनात्मक आहेत.शिवाय विठ्ठल भेटीच्या अलौकिक आनंदाचा गाभा विषद करतानाही तिथल्या निर्माल्य स्वछतेलाचं प्रभूसेवा मानणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यातल्या नायकालासुद्धा आपण आपल्या रचनेत मानाचं पान वाढलंत. हिच आपल्या विचारांची श्रीमंती आहे! सर, समाजात विविध क्षेत्रात आपापल्या जागी उत्तमोत्तम सामाजिक कार्य करणाऱ्या इतरांविषयी आपलं कुतूहल सदैव जाग ठेवून, अशा समाजरत्नांना टिपून, त्यांच्या कार्याला प्रसिद्धी देऊन, आपण त्यांना नेहमीच स्वानंदाचे मोकळे आकाश प्राप्त करून दिलेत. म्हणूनच आज ही आपली रचना आपण आदरपूर्वक ह. भ. प श्री. सखाराम महाराज यांना समर्पित केलीत. आपल्या हया नि:स्पृह भावनेस आमचा जाहीर सलाम! 🙏🙏🙏
@somasticsj6639
@somasticsj6639 2 года назад
❤️
@subhashlad7366
@subhashlad7366 2 года назад
मनापासून धन्यवाद !
@sanjaychandramore4096
@sanjaychandramore4096 2 года назад
खूपच सुंदर. गीत रचना अप्रतिम. गोड आवाज.
@shashikantpednekar8905
@shashikantpednekar8905 2 года назад
Apratim shabd rachana sravniy geet 👌🙏
@virajchavan436
@virajchavan436 2 года назад
वेगळी रचना, छान सुंदर... नेहमीप्रमाणे अप्रतिम टीम वर्क👍
@sunilkajolkar7689
@sunilkajolkar7689 2 года назад
Bbakti geetachi rachana ,sangeet aani avaj far sundar aani manala samadhan denare ahe.
@yadnyeshpednekar8666
@yadnyeshpednekar8666 2 года назад
🌹🌹🙏
@DEVGAD_Entertainment
@DEVGAD_Entertainment 2 года назад
Lyrics 👌 Music 👌..... SUNDAAR.......
@sanjanamore511
@sanjanamore511 2 года назад
🌼🙏
@gurudattahalwe5811
@gurudattahalwe5811 2 года назад
सुंदर चाल आणि गोड आवाज उत्तम काँम्बीनेशन
@sachinchoughule8716
@sachinchoughule8716 2 года назад
Nice song...Also music
@rushikeshjadhavrj5484
@rushikeshjadhavrj5484 2 года назад
मस्त भैरवी 👌👌
@rajeshpednekar3831
@rajeshpednekar3831 2 года назад
अप्रतिम सुभाष काका
@adinathjadhav5326
@adinathjadhav5326 2 года назад
Khup chan.. 🙌
@anagha792
@anagha792 2 года назад
Khup Chan Sangeet
@gadkillepratishthan1872
@gadkillepratishthan1872 2 года назад
👌🚩अप्रतिम🚩👌
@sulochnakadam6420
@sulochnakadam6420 2 года назад
Chan
@rushikeshparab5977
@rushikeshparab5977 2 года назад
Apratim 🙏💯
@vivekanandkhambete3264
@vivekanandkhambete3264 2 года назад
❤️❤️👌
@akankashajadhav4769
@akankashajadhav4769 2 года назад
मस्तच
@pramodmestry3912
@pramodmestry3912 2 года назад
खूप छान सर
@AkshataBandiwadekar
@AkshataBandiwadekar 2 года назад
खूप छान 👌🏻👍🏻
@Surekha-shraddha
@Surekha-shraddha 2 года назад
खुप छान 👌👍
@sharmilakadam4964
@sharmilakadam4964 Год назад
अप्रतिम
@pradeeplad6735
@pradeeplad6735 2 месяца назад
खुप छान
@gurumauli75
@gurumauli75 2 года назад
मस्तच
@rajendrabijam8413
@rajendrabijam8413 2 года назад
खुप सुंदर
Далее
skibidi toilet 77 (part 3)
04:51
Просмотров 15 млн
विट्ठल - Vitthal | Chant 1008 Times
16:55
Просмотров 416 тыс.