Тёмный

मकरंद, विजय कदम यांसह सर्व वऱ्हाडींच्या दिमतीला विजय पाटकर 

Ram Kondilkar
Подписаться 2,5 тыс.
Просмотров 37
50% 1

सर्वांचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरे, २१ अवली विनोदवीर वाजंत्र्यांसोबत अख्या महाराष्ट्राला खळखळून हसविण्यासाठी सज्ज झाला आहे. कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्यासह अतुल राजारामशेठ ओहळ यांनी ही फुल्ल मनोरंजनाची ट्रीट 'स्वराज फिल्म प्रॉडक्शन'द्वारे आणली आहे. त्यांची पहिलीच निर्मिती असलेला “वऱ्हाडी वाजंत्री” हा मल्टीस्टारर चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु होते तेव्हा चित्रपटातील मकरंद अनासपुरे, पॅडी कांबळी, हेमांगी कवी, अभिनेत्री प्रिया बेर्डे, जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, विजय कदम, जयवंत वाडकर, प्रभाकर मोरे या प्रमुख कलावंतांसोबत सहनिर्माते अतुल राजारामशेठ ओहळ, कार्यकारी निर्माता इंदुराव कोडले यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.
वैभव अर्जुन परब लिखित “वऱ्हाडी वाजंत्री” या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या मकरंद अनासपुरेंसोबत जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, रीमा लागू, पंढरीनाथ कांबळी, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, राजेश चिटणीस, प्रशांत तपस्वी, विनीत बोंडे, जयवंत भालेकर, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे इत्यादी कलाकार आहेत. या चित्रपटाच्या संगीताची लीलया समर्थपणे संगीतकार अविनाश विश्वजित, शशांक पोवार यांनी पेलेली असून गीतकार राजेश बामगुडे यांच्या गीतांवर स्वरसाज गायक आदर्श शिंदे, आनंदी जोशी, मैथिली पानसे-जोशी, स्व. नंदू भेंडे, गणेश चंदनशिवे यांनी चढवला आहे. तर त्यावर नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव, राजेश बिडवे यांनी केले आहे. जयेश मिस्त्री यांनी हा चित्रपट महाराष्ट्रात वितरीत केला होता.
प्रसिद्धी जनसंपर्क प्रमुख : राम कोंडू कोंडीलकर

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
ДУБАЙСКАЯ ШОКОЛАДКА 🍫
00:55
Просмотров 2,3 млн