Тёмный

मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारा-श्री मलंगगड | ४ वर्षाच्या चिमुकल्याने रचला इतिहास |MalangGad 

Psycho Prashil
Подписаться 444 тыс.
Просмотров 397 тыс.
50% 1

►RU-vid - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Prashil Ambade
------------------------------------------------------------------------------
-"सह्याद्री रॉक एडवेंचर" सोबत साहसी व अवघड ट्रेक करण्यासाठी खालील नंबर वरती संपर्क करा:
पवन घुगे :- 8691075767
दर्शन देशमुख :- 8888251143
Music from #InAudio: inaudio.org/
Track Name.inaudio - Infraction - Alioth
------------------------------------------------------------------------------
मलंगगड कल्याणपासून दक्षिणेस १६ कि.मी. अंतरावर एका उंच डोंगरावर बांधलेला आहे आणि तो पनवेल वरुण वावंजे गावपासून २ कि.मी.च्या अंतरावर आहे, बदलापूरच्या नैर्ऋत्येस व मुंबई आणि साष्टीच्या पूर्वेस हा किल्ला आहे. करंजा व उरण नैर्ऋत्येस आणि बोरघाट, भीमाशंकर व माळशेज घाट पूर्वेस असा हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता.
इतिहास :
ॲबिंग्डन ह्या इंग्रजी अधिकाऱ्याने १७८० मध्ये मलंगगडाला वेढा घातला. पावसाळ्यात मराठे युद्ध टाळतात हे लक्षात घेऊन बेसावध मराठ्यांवर भर पावसातच हल्ला करण्याचे त्याने ठरवले. लढाई सुरू होताच नैर्ऋत्येच्या व उत्तरेकडच्या वाटा बंद करून टाकल्या. त्याने प्रथम पीरमाची घेण्याचे ठरवले. तेथे पांडुरंग केतकर यांस ३०० माणसांनिशी नेमलेले हाते. अचानक हल्ला झाल्यामुळे मराठ्यांनी प्रतिकार केला नाही. १२५ जण सोने माचीकडे धावले. तर बाकी गडावर जागा नव्हती म्हणून कल्याणच्या मामलेदाराकडे धावले. ॲबिंग्डनने गडावर पोहचण्यासाठी गडाच्या पायथ्यापासून पीर माचीपर्यंत वाट शोधून काढली. नाना फडणविसाने वेढा उठवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. ॲबिंग्डनने पीर माचीच्या पठारावर तीन तोफा चढवल्या व सोने माचीवर गोळीबार चालू केला. पण प्रवेशद्वार मोठ्या खुबीने बांधले असल्यामुळे तेथवर गोळे पोहचेनात. मराठ्यांना जंगलातल्या अनेक चोरवाटा माहीत असल्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटण्याचा संभव नव्हता. किल्लेदाराने आनंदराव धुळप व काशीपंत यांच्याकडे मदत मागितली पण त्यांनी प्रत्यक्ष न येता ७०० शिपाई पाठवले जे तेथवर पोहचू शकले नाहीत. कॅप्टन ॲबिंग्डनने शिडा लावून २५० माणसे सोने माचीवर चढवली. पण मराठ्यांनी गडावरून दगडधोंड्यांचा वर्षाव करून त्यांना परत पाठवले. ॲबिग्डनने पीर माचीवरून तोफा काढून घेतल्या. गंगाधररावाने संधी साधून दाणापाणी व दारूगोळा भरून घेतला. नाना फडणीसांनी बाळाजी विश्वनाथ पाठक व राधो विश्वनाथ गोडबोले यांना सैन्य देऊन वेढा उठवण्यास पाठवले. त्यांच्या फौजा शिरवळ या मलंगच्या उत्तरेला असलेल्या गावी पोहचल्या. मराठांची फौज तीन हजारावर होती. त्यांनी शत्रूला हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले. १६ सप्टेंबरला गारांची एक पलटण पीर माचीवर चाल करून गेली. त्यांनी तोफांवर हल्ले केल्यामुळे ब्रिटिशांनी घाईघाईने तोफा काढून घेतल्या.
मेजर वेस्टफॉलने ॲबिंग्डनच्या मदतीसाठी जादा कुमक धाडली. या सेनेने रसद घेऊन येणाऱ्या मराठांच्या तुकडीला उद्ध्वस्त केले. त्यामुळे मलंगगडावर अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. काही धान्य पावसाने नासले, खजिना संपत आला. मराठ्यांनी इंग्रजांचेही दळणवळण तोडून टाकले होते. तेव्हा कर्नल हार्टलेने बेलापूर, पनवेल, तळोजे मार्ग सुरक्षित केला. ब्रिटिशांनी कॅप्टन कारपेंटरच्या हुकमतीत मलंगगडावर दुसरा हल्ला चढवला. तोफांचा भडिमार सुरू केला. तटाला भगदाड पडले की आत घुसायला ३५० सैनिक तयार ठेवले होते पण केतकरांनी किल्ला शौर्याने लढवला. इंग्रजांचे बरेच सैनिक कामी आले. तेव्हा इंग्रजांनी हल्ले थांबवले. पण वेढा मात्र उठवला नाही. पीर माचीवरून तोफा काढून घेतल्या. मराठ्यांची नाकेबंदी करून त्यांची उपासमार करून त्यांना शरण यायला लावावे असे इंग्रजांनी ठरवले. बाहेरून गंगाधर कार्लेकर काही मदत पाठवू शकले नाहीत. शेवटी नाना फडणविसाने काही सरदारांना हाताशी घेऊन मोठी फौज जमा केली आणि मलंगगड व वसईवर धाडली. स्वतः नाना व हरिपंत फडके दहा हजार फौजेसह खंडाळ्याला आले व त्यांनी राजमाची घाट उतरून कल्याणकडे जायचे ठरवले. त्यामुळे हार्टलेला प्रतिशह दिला जाणार होता. ताबडतोब हार्टलेने मलंगगडावरून सैन्य काढून घेतले व लगेचच मराठांनी मलंगगडाकडे जादा कुमक व रसद धाडली. अशाप्रकारे मराठांनी अखेरपर्यंत मलंगगड शर्थीने लढवला.
गडावर जाण्याच्या वाटा :
कल्याणहून सकाळी अर्ध्या तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोहचता येते. पनवेल वरुण वावंजे गावांसाठीही बसची सोय आहे, वावंजे गावपासुन २ की.मी. अंतरावर गडाचा पायथा आहे, पायथ्यापर्यंत रिक्षाची सोय आहे, गडाच्या निम्म्या उंचीवर तेथील सुप्रसिद्ध हाजीमलंग दर्गा आहे. तिथपर्यंत पायऱ्या आहेत. वाटेत दुकाने आहेत. एक देवीचे मोठे मंदिर आणि शंकराचे लहान देऊळ आहे. वरच्या या दर्ग्यापर्यंत भविकांची भरपूर वर्दळ असते. दर्ग्याच्या अलीकडे दुकानांच्या रांगेतून एक बोळ उजवीकडे जातो. तेथे घरे आहेत आणि विहीरही आहे. वाट समोरच्या डोंगराला लागून उजवीकडून वर चढायला लागते.
राहण्याची सोय:
येथे राहण्याची सोय आहे
जेवणाची सोय:
येथे जेवणाची सोय आहे. गडावर लहान मोठी हॉटेले आणि इतर दुकाने आहेत.
पाण्याची सोय:
गडावर अनेक टिकाणी पाण्याची टाकी आहेत. यातील पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकते.
जाण्यासाठी लागणारा वेळ:
पायथ्यापासून २ तास.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------Ignor Hashtags:
#MalangFort #ShriMalang #HajiMalang #Gorakhgad #गोरखगड #GorakhgadfFort #Bhairavgad #Rajgad #Rajgadfort #Raigad #SudhagadFort #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
Далее
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Просмотров 9 млн
Live
3:24:57
Просмотров 2 тыс.