Тёмный

मागण्या मान्य झाल्याने महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन मागे, सविस्तर बघा काय म्हणाले शासकिय अधिकारी 

I CON TV
Подписаться 4,1 тыс.
Просмотров 46
50% 1

मागण्या मान्य झाल्याने महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन मागे
-------------------------
माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप विधानसभा गाजली
----------------------------
महाविकास आघाडीच्या यशस्वी आंदोलनासाठी उन्मेशदादांचे अभिनंदन - माजी मंत्री गुलाबराव देवकर
--------------------------
मागण्या मान्य केल्याचे प्रशासनाचे पत्र
तिसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांचा जल्लोष कायम
-------------------------------
जळगाव - ज्वारी 30 तारखेच्या सर्व खरेदी करावी.कापसाचा भाव फरक बाबत शासनाची वेगळी भूमिका असून देवेंद्र फडणवीस यांनी शुद्ध खोटे बोलले आहेत. ही वस्तुस्थिती प्रशासनाने मान्य केली आहे.त्याचप्रमाणे दुध संघाने वेळेत यादी अपलोड न केल्याने अनुदान देऊ शकलो नाही. येत्या 15 तारखेपर्यंत दूध संघ याद्या देत आहेत. असे लेखी उत्तर देत उर्वरित मागण्यांसाठी राज्यस्तरावर बैठकीचे नियोजन करण्याच्या आश्वासन दिल्याने शेतकरी बांधवांचे समाधान झाल्याने आज धरणे आंदोलन तिसऱ्या दिवशी थांबवतो आहे.अशी भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून महाविकास आघाडी व शेतकरी संघटना तसेच समविचारी संस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू होते. आज उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाते यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, दुग्ध उपसंचालक,जिल्हाधिकारी कार्यालय चिटणीस आदी अधिकाऱ्यांनी मागण्या बाबत लेखी पत्र देवून माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांना धरणे आंदोलन मागे घ्यावी. अशी विनंती केली उपस्थीत कार्यकर्ते पदाधिकारी व नेते शेतकरी बांधवांनी एकदिलाने धरणे आंदोलन मागे घेतले.
याप्रसंगी माजी खासदार उन्मेशदादा पाटील, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे,महानगराध्यक्ष शाम तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक लाडवंजारी,ज्येष्ठ नेते गजानन मालपुरे, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, महापौर जयश्रीताई महाजन, नगरसेवक सुनिल महाजन, जयाताई तिवारी, जेष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर,सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील,जामनेर शहराध्यक्ष दीपक राजपूत, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील, उपजिल्हाप्रमूख महेंद्र पाटील,भाऊसाहेब सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव खलाणे,अशोक सानप,देवचंद साबळे, महेंद्र जैस्वाल, शैलेंद्र सातपुते,सरचिटणीस दीपक सोनवणे,सरचिटणीस राहुल भालेराव, प्रा.विशाल पवार, गोकुळ चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस इब्राहीम तडवी, सुनील माळी, वाय एस महाजन, प्रमोद पाटील, सोपान पाटील, बहुजन मुक्ती मोर्चाचे राजू खरे, चंद्रकांत पाटील भादली, दिपक पाटील, अशोक सोनवणे, प्रदीप पाटील, विजय लाड, विशाल वाणी,नरेंद्र पाटील, उमेश चौधरी, भगवान धनगर,सचिन चौधरी, गणेश गायकवाड,ग्रामीण तालुकाप्रमुख उमेश चौधरी, पंचायत समिती सभापती भाऊसाहेब पाटील, सरपंच रवीबाबा राजपूत, पंचायत समिती सदस्य रविभाऊ चौधरी, ज्येष्ठ नेते पद्माकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते नरेन जैन, जयसिंग भोसले, सुरेश पाटील, नगरसेवक पप्पू राजपूत, मुकेश गोसावी, कैलास पाटील,अनिल चव्हाण, अनिल गोरे, रमेश बैरागी, नरेश दळवी, नितिन पगारे, गोपाळ ठाकरे यांच्यासह पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रारूप विधानसभेतून मंत्र्यांचे वाभाडे
याप्रसंगी कार्यकर्त्यांनी प्रारूप विधानसभा तयार करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विद्यमान मंत्र्यांचे वाभाडे काढले.या प्रारूप विधानसभेला शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. खासदार उन्मेषदादा पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांच्या रूपात ही प्रारूप विधानसभा चालवली.
महाविकास आघाडीच्या वतीने नाकर्त्या राज्य सरकारच्या विरोधात यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी धरणे आंदोलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल माजी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आभार मानतो असे ते म्हणाले. जिल्हा दुध संचालक प्रमोद पाटील यांनी तिन दिवस कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी यांनी मेहनत घेत उन्मेशदादा यांचे नेतृत्वाखाली आंदोलन यशस्वी केले. यापुढे देखील महाविकास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्यास एकदिलाने काम करणार असल्याचे सांगीतले. सह संपर्क प्रमूख गुलाबराव वाघ यांनी पत्रकार, जिल्हा प्रशासन,पोलिस प्रशासन, कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Опубликовано:

 

11 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Я НЕ ОЖИДАЛ ЭТОГО!!! #Shorts #Глент
00:19
Китайка Шрек всех Сожрал😂😆
00:20
EXCLUSIVE: India TV talks to Muslims of Malegaon
16:46
Просмотров 420 тыс.
PM's address at NCP Chief Sharad Pawar's book release
13:28