Тёмный

माजी सभापती सौ. नंदा काकी सुर्वे यांनी संकुलाच्या  

Rahul Chandankar
Подписаться 1,1 тыс.
Просмотров 84
50% 1

माजी सभापती सौ. नंदा काकी सुर्वे यांनी दत्त संकुलाच्या बाल आनंद बाजार उद्घाटन प्रसंगी आपल्या मनोगतातून
"आपल्या पालकांनी आपल्या शेतात पिकवला जाणारा माल बाजारपेठेत कोणत्या भावाने विकला जातो याचे ज्ञान या बाजारातून मिळते असे मत मांडले."
या बाल आनंद बाजार मेळाव्यात अनेक विद्यार्थ्यांनी संक्रांतीचे विशेष असे सर्व वाण विक्रीसाठी आणले होते. यामध्ये संक्रातीची भाजी ज्वारीचे, कणीस, गाजर, घेवडा, वांगे ,ऊस, बोर, डहाळा, तीळ, बाजरीचे पीठ, तिळगुळ यासाठी महिलाची मोठी गर्दी सुरू झाली होती. त्याचबरोबर बाजारामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या भाज्या , फळभाज्या व फळे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करणेत आल्या होत्या.
खवयांसाठी खास मेजवानी म्हणून पाणीपुरी, पॅटीस, चिवडा, पावभाजी,वडापाव,भेळ,ढोकळा,मसाला पापड, फ्रुटी व चहा असे विविध प्रकारचे पदार्थ होते.सर्वजण खाऊ गल्लीचा मनमुराद आनंद घेत होते आणि प्रत्येकाच्या तोंडून विद्यार्थ्यांसाठी कौतुकाचे गौरव उद्गार निघत होते.
या बाल बाजारामध्ये स्टेशनरी, घरामध्ये उपयोगी असणारे विविध वस्तू, कपडे, घरामध्ये लावायचे तोरण अनेक अशा विविध वस्तू,विक्रीसाठी बालचमूनी आणले होते.
या संकुलातील बाजारामध्ये
" QR कोडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन व्यवहाराचे," कौतुक संस्थेचे अध्यक्ष तथा समाज कल्याण समितीचे मा. सभापती मा.शिवाजी कांबळे यांनी आपल्या मनोगतात केले.
आपल्या मुलांच्या व्यावहारिक ज्ञानाला, ( बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ) सामाजिक ज्ञान, संभाषण कौशल्य, वाढण्यासाठी या बाजाराच्या माध्यमातून विशेष प्रयत्न होतो. बाल आनंद बाजारातून 96377 रुपयांची उलाढाल झाली.
या कार्यक्रमासाठी सौ.नंदा (काकी) सुर्वे, बाबू (तात्या) सुर्वे, कुंभार गुरुजी, लोकरे साहेब, सदाशिव पाटोळे, अमित कोळी, उपाध्यक्ष मोहन (भाऊ) पावणे, सचिव प्रकाश इंगळे, आनंद सुर्वे, माधव सुर्वे, शितल महाडिक, केंद्रप्रमुख शिवराज ढाले सर ,प्राचार्य रणदिवे सर मुख्याध्यापक अमोल सरडे सर, पालक पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य रणदिवे सर यांनी केले तर सूत्रसंचालन सुरवसे मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे आभार श्री.निलकंठ पवार सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3   
@adarshpublicschool4982
@adarshpublicschool4982 9 месяцев назад
🎉🎉
@Artists-sf8cq
@Artists-sf8cq 9 месяцев назад
Nice
@aps_virtual526
@aps_virtual526 9 месяцев назад
Nice
Далее
Which version is better?🎲
00:14
Просмотров 3,8 млн