For more videos please like, comment & subscribe the channel
स्वर - आनंद देशपांडे
Sung By Anand Deshpande
लागली समाधी झाले दंग समाधीत
ध्यान लागले मी आले एक मंदिरात ।।धृ ।।
स्थापिली मनाने मूर्ती याच मंदिरात
ठेवियले नाम प्रेमे गुरुदेव दत्त
आरंभिली मानस पूजा भक्ती भावनेत
ध्यान लागले ।।१।।
घातिले सचैल स्नान वस्त्र नेसविले
आसना वारी नंतर ते देव बैसविले, गुरु बैसविले
उटी चंदनाची लेपण गंध सुगंधित
ध्यान लागले ।।२।।
गुंफूनि फुलांच्या मला सुशोभित केल्या
उजळोनि धूप दीप वंदनाशी केले
मनःशांति लाभो मजला तीर्थ प्रसादात
ध्यान लागले ।।३।।
17 окт 2024