आदरणीय निजाम भाई शेख आपणास दंडवत कलगी तुऱ्याच्या माध्यमातून आपण अध्यात्माचा प्रचार करत आहात याचा आमच्या सारख्या छोट्या शाहिराना खूप कौतुक वाटते आपण सांगिलेले कलगी तुऱ्याचे विश्लेषण मनाला पटले रामकृष्ण हरी माऊली.शाहीर सुभाष नगरकर मु. भवानी नडगाव ता. महाड जि. रायगड
शिवनेरी संवादवाले असे बरेच महाराष्ट्रातील मुसलमान लोक अध्यात्माकडे वळलेले दिसून येतात. ऐक आणि धार्मिकता यांची सांगड हेच भक्ती मार्गाला लागलेले लोक घालुन देतात.धन्य माऊली. शिरसाष्टांग दंडवत. असेच जगावेगळे मुलाखती दाखवा. धन्यवाद.👍🙏🙏🙏🙏
शाहिर खुपच छान आपल्या कार्याचा गौरव असाच होत राहो ही शुभेच्छा एक छोटासा प्रश्न होता उत्तर दिले तर फारच बरे होईल वानर राज वाली पुर्व जन्मी कोण होता तेवढे कळवा माऊली
आदरणीय निजाम भाईंचा एक मुद्दा मला अतिशय महत्त्वाचा वाटला.. कोणत्याही धर्मात किंवा धार्मिक ग्रंथामध्ये हिंसाचार सांगितला नाही.! धर्माच्या नावाखाली हिंसाचार करणा-यांनी सर्वप्रथम आपल्या धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास केला पाहिजे.!
खुप खुप खुप छान आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून एक व्यापक ह्रृदयाचं व्यक्तिमत्व महणजे निजाम भाई शेख आहेत, मुलाखत ऐकून भेट घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे, परंतु युट्युबवर कलगीतुरा उपलब्ध असेल तर लिंक पाठवा हि नम्र विनंती...!
मुलाखत घेणाऱ्या वर टीका नको, त्यांचा अभ्यास थोडा कमी असू शकतो, पण निजाम भाई खोटारडा व चुकीची माहिती देतो असली कमेंट कृपया करू नये,काय चूक आहे हे निदर्शनास आणणे गरजेचे आहे।