Тёмный

राजर्षी छत्रपती शाहू महाराज I व्याख्यान I प्रा. शिवाजीराव भोसले  

My Marathi
Подписаться 8 тыс.
Просмотров 33 тыс.
50% 1

राजर्षी छत्रपती शाहू महाराज I व्याख्यान I प्रा. शिवाजीराव भोसले
छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती (इ.स. १८८४-१९२२ दरम्यान) होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.
शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. सन १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते.[१] २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.
कार्य:
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.
‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.
स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी केलेला आहे
महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला.
त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले.
त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली.
#marathi #maratha #shahumaharaj #chatrapati #chatrapatishahumaharaj #kolhapur #kolhapurpalace #newpalace #kolhapurroyalty #sansthan #shahujimaharaj #shivajiraobhosale

Развлечения

Опубликовано:

 

24 авг 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
@nileshpathak7926
@nileshpathak7926 Год назад
हा दैवी आवाज फक्त शांतपणे ऐकायचा , आणि या वाग्यज्ञात फक्त श्रवण भक्तीची आहुती द्यायची .
@my.marathi
@my.marathi Год назад
बरोबर!
@prabhakarmarodkar5574
@prabhakarmarodkar5574 Год назад
👍💫🌺👌🍀🙏🏻🚩धन्यवाद महोदय नमस्कार 01/23
@my.marathi
@my.marathi Год назад
आभारी आहोत!
@mohitgavali6860
@mohitgavali6860 Год назад
महान कार्य. अद्वित्तीय कारकीर्द 🙏🙏असा राजा होणे नाही. महाराष्ट्रातील आजच्या राजकीय पुढऱ्यांनी काहीतरी आदर्श घ्यावा. कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र 🙏राजश्री छत्रपती शाहू महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏
@dilipnikam1911
@dilipnikam1911 Год назад
शाहू महाराजांच्या त्या थोर विचारांना त्रिवार अभिवादन असे लोक कल्याणकारी राजे परत होणे ह्या पृथ्वीवरती अशक्य आहे
@blossomchildrenscenter8000
@blossomchildrenscenter8000 16 дней назад
अप्रतीम ❤
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 Год назад
लोकराजे राजश्री सर्वश्री छत्रपती शाहू महाराज सरकार 🙏🏻💐
@dadasaheblad4147
@dadasaheblad4147 Год назад
Great 👌🥰
@shraddhaghag8981
@shraddhaghag8981 Год назад
त्रिवार वंदन,
@sohamhendre7892
@sohamhendre7892 Год назад
Great
@ranjanabhalerao5462
@ranjanabhalerao5462 Год назад
अतिशय शहारे आणणारी व प्रेरणा देणारे....जय राजर्षी शाहू
@vinoddhore303
@vinoddhore303 Год назад
महान
@ranjanabhalerao5462
@ranjanabhalerao5462 Год назад
त्रिवार सलाम .
@ashokkumnale6014
@ashokkumnale6014 Год назад
सम्राट लोकशाहीच्या संरक्षणाचा, समानतेचा, जनक सामाजिक न्यायाचा, सामाजिक आरक्षणाचा, भोक्ता कुस्तीचा,शौकीन शिकारीचा..... राजा माझा, तुझा, तुमचा, त्यांचा, अगदी सर्व बहुजनांना......
@bhagyashrikhare3951
@bhagyashrikhare3951 Год назад
समर्पक
@ruturajkanher9673
@ruturajkanher9673 Год назад
शब्द थांबतात....आणि फक्त हात जुळतात....
@rajgondachougule593
@rajgondachougule593 11 месяцев назад
✌✌✌
@vijaypatil383
@vijaypatil383 Год назад
🙏
@mohitgavali6860
@mohitgavali6860 Год назад
महान राज्या 💐💐💐💐
@ramkauarchaure3666
@ramkauarchaure3666 Год назад
💯👌👌
@rahulsenglishtalk1336
@rahulsenglishtalk1336 Год назад
👍👍👍👍
@ashishpawar2534
@ashishpawar2534 Год назад
Wow thank u very very much
@sitaramjawale1962
@sitaramjawale1962 Год назад
ऊन
@bbbelekar9193
@bbbelekar9193 Год назад
RAYATECHA RAJA .LOK RAJA
Далее
Sant Dnyaneshwar (Vyakhan)
58:30
Просмотров 135 тыс.
Ya Sathi Bolne Aikane
47:08
Просмотров 406 тыс.
Детство злой тётки 😂 #shorts
0:31
Моя Жена Босс!
0:40
Просмотров 2,2 млн
Каха бизнес-класс
0:48
Просмотров 3 млн