झटपट होत नाही तेवढं सगळंमटेरिअल तयार करायला बराच अवधी लागतो. झटपट म्हणताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही.याचा अर्थ तुम्हाला झटपट शब्दाचा अर्थ कळत नाही हे सत्य.
मला अर्थ कळलाच कदाचित तुम्हाला कळला नसेल. आपण नाष्ट्यामध्ये इडली बनवतो तेव्हा ते तांदुळ डाळ भिजत घालतो नंतर ते आंबवण्यासाठी ठेवतो मग दुसऱ्या दिवशी इडली बनवतो हा झटपट नाष्टा नाही पण जर रव्याची इडली बनवली तर त्या मध्ये आपण इनो किंवा सोडा वापरतो तो असतो झटपट नाष्टा(Instant). Instant ह्या शब्दाचा मराठी अर्थ झटपट असा होतो. दोन्ही इडली शिजवायला सारखाच वेळ लागतो. पण रव्याच्या इडलीला झटपट बनणारा नाष्टा म्हणतात. आता व्हिडिओ मध्ये जो नाष्टा बनवला आहे त्यामध्ये आपण जे पदार्थ घरात आहेत तेच घेऊन नाष्टा बनवला तर कुठेही भिजत घातलेले नाही, किंवा कुठलाही पदार्थ उकडलेला नाही मग ह्या नाष्ट्याला झटपट नाही म्हणणार तर काय म्हणायचं. जे पदार्थ डब्ब्यातुन काढले तेच तिथेच वापरले. धन्यवाद 🙏🙏