लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, आणि मी ह्या संस्कृतीच जतन करतोय याचा मला सार्थ अभिमान आहे... . . Follow Me On Instagram:- / pawan_tatkare Follow us on Facebook:- / pawan-tatkare-10655818...
Hello Folks ❤️. Thank You So Much For Your Great Response ❤️ I feel greatful that I have a people like you around me❤️. There are 9000+ comments. I can't reach to all.. But I respect everyone comments, suggestions and negative response also.. So please connect with us ❤️ Because of your love I can reach 50k+ subscribers on RU-vid.. Once again thank You so much 🙌
अशी कला देव त्याच माणसांना देतो ज्याला ह्या कलेच महत्व कळत असत... आणि ती कला लोकांसमोर यावी ह्यासाठी संधी सुद्धा देतो जशी तुला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिली 🎉🎉💥
भावा तुझा अभिमान वाटतो.कला ही कलाच असते.कलाकार हा देवालाही प्रिय असतो.तुझ्या सारखं नाचणे आमच्या सात जन्मात नाही जमायचं. मनापासून अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
जिगर लागत भाऊ ह्याला......👌अप्रतिम सादरीकरण भाऊ............. पोरी सुधा लाजल्या ..............कोणताही मेकअप न करता पण तुझी लावणी बघताना कंटाळा नाही आला .......एकच नंबर😍😍😍😘😘😘
Ho boys ne asach asaila pahije 😉 Girls kartat na belly dance vagre na lazta Mug Boys ne lavni kartana ka lazaicha 🙄 Ani te Nacha loke fakta ek thotand ahe
लाजेलाही लाजविल असा डान्स होता भावा तुझा, लाजवाब को क्या जवाब दे ❤👌🙏त्यातुन तुझी मेहनत, श्रद्धा, साधना, आणी कलेवरच प्रेम सार काही न सांगताच दिसत होत, अप्रतिम तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏जय शिवराय 🙏❤👌
भावा जिंकलस सगळ्यांना ही डेरिंग करणे काही साधी गोष्ट नाही सगळ्या मुली सुद्धा तुझ्या फैन झाल्या असतिल कारण मुलिनी जर हा डांस केला असता ना तर सगळे म्हणाले असते मस्त,कडक,छान,सुंदर,अप्रतीम पण मी म्हणतो मित्रा तू खरा लावणीसम्राट नाद खुळा काम केलेस
वाघाचं काळीज लागतंय लावणी वरती नाचायला खरच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती वेगवेगळ्या रंगानी भरलेली आहे त्यात अशे कलाकार आणखी रंग भरतायत ...एकच शब्द आपल्या भावासाठी "अप्रतिम"❤️
नमस्कार, तू कोणताही मेकअप न करता ,तू सुंदर लावणी नृत्य सादर केले ,कलेला कोणतीही जागा म्हणजे स्टेज,साहित्य नसेल तरी कला ही फुलणार ,ते तू सिद्द केलेस ,अशीच प्रगती करत जा ,इतरही डान्स केले की व्हिडीओ टाकत जा,तुझे खूप कौतुक
अप्रतिम भावा 👍🏻🔥 एखाद्या मुलीला लाजवेल अशी लावणी सादर केली तू .. लावणी मध्ये सगळ्यात महत्त्वाचे असतात ते म्हणजे शारीरिक हरकती त्याच बरोबर चेहऱ्यावरील expressions चे तू अगदी सहज पणे केलेस खूप छान भावा ❤ 👍🏻🔥
पवन खूपच छान. अरे "चला हवा येवू द्या" मध्ये नाही का सागर कारंडे,भाऊ कदम कोणतेही स्री पात्र करतातच ना . हा कलेचा भाग आहे. ज्याला जमत तोच करू शकतो. तुझी लावणी सादर करण्याची कला खूपच अप्रतिम आहे. कुणाचही काम नाही. पण तुझ कौतुक करावं तेवढं कमीच आहे. भावी काळातील तुझ्या सादरी करणास खूप खूप शुभेच्छा.
ज्या लोकांनी dislike केले त्यांनी अर्ध्या कपड्यात धिंगाणा घालतात तोच बघावा...त्यांना लावणी किंवा लोककला हा प्रकार कधी समजणार नाही किंबहुना त्यांच्या समजण्या पलीकडचा आहे...बाकी भाई तू एक नंबर dance केला... हिम्मत पाहिजे इतक्या लोकांसमोर सादरीकरण करायला....👍🏻
Marvelous... Performing a female dance for a boy it is not a joke... Face expressions, body posture, correct steps every thing is wonder full. Best performance... I watched it minimum ten times.
मित्रा जिंकलस तू बेभान आहेस असाच रहा तुझी energy ultimate आहे पोरा तुला मानले खूप मोठ्ठा हो मित्रा खूप मोठ्ठा हो तुझा डान्स पाहून डोळे पाणावले मस्त छान अप्रतिम.... गोड bless you
कडक रे भावा🔥 कलाकार समजुन घेणं हा सामान्य बुद्धिमत्ते च्या पलीकडील गोष्ट आहे. एका मुलासाठी लावणी करणे हे खरंच खुप मोठा चॅलेंज आहे कारण तीच्यातील अदाकारी आणी नाजुकपणा समभाळत परफॉर्मन्स मरण म्हणजे सोपं नाही पण भावा तु खरच खुप छान परफॉर्मन्स केला
Pratekveli mulichi mulabarobr n mulachi mulibr barobari kelich pahije ka uttam dance kela as mhnu shkto ki apn tyasathi striyanna kmi lekhnyachi aavashykta nhi
अभिनय आणि डान्स ही कला नुसतं क्लास लावून नाही शिकता येत तर त्यासाठी आपलयातच तो बाज ते अंग असायला हवं, जी तूझ्यात आहे.मुलींना लाजवेल अशी अदा तुझ्यात आहे, कसली लावणी सादर केलीस भन्नाट,जाम भारी करतोस डान्स.👌😊 प्रयत्न करत रहा. भरपुर सदिच्छा पुढच्या वाटचालीला.
चांगला नृत्य करणाऱ्या एखाद्या मुलीलाही सुद्धा लाजवेल असा नाच केलास भावा, एक क्षण असा होता की वाटलंच नाहीं की मुलगा लावणी करतोय well done bro kip up दोस्ता😊
हे dislike करणारे जस काय तमाशातल्या फडातलेच आहेत आणि त्यांना या डान्स पेक्षा भारी डान्स येतो म्हणून त्यांनी dislike केलं दुस र्यांची तारीफ करायला खुप मोठ मन लागत